ट्रक चालकांना लुटणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2017 01:26 IST2017-07-12T01:26:27+5:302017-07-12T01:26:27+5:30

बाळापूर : राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकांना लुटणाऱ्या टोळीला बाळापूर पोलिसांनी १० जुलै रोजी रात्री १ वाजता जेरबंद केले.

The robbers rob the truck driver | ट्रक चालकांना लुटणारी टोळी जेरबंद

ट्रक चालकांना लुटणारी टोळी जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्क
बाळापूर : राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकांना लुटणाऱ्या टोळीला बाळापूर पोलिसांनी १० जुलै रोजी रात्री १ वाजता जेरबंद केले. गेल्या दहा दिवसांपासून ही टोळी दुचाकीवर येऊन ट्रक चालकांना लुटत होती. यातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर एक आरोपी पसार झाला आहे. चारही आरोपींना बाळापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
राष्ट्रीय महामार्गावर रात्री प्रवास करणाऱ्या ट्रक चालकांना अकोल्यातील काहीजण दुचाकीने येऊन लुटत होते. हा प्रकार गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू होता. पोलिसांचा ससेमिरा नको म्हणून ट्रक चालकांनी या घटनेची तक्रार करीत नव्हते. एका चालकाने सोमवारी ही बाब बीट जमादार राजू सोळंके यांना सांगितली. त्यांनी रात्री जीवाची पर्वा न करता ट्रक चालकाने सांगितलेल्या वर्णनाच्या दुचाकीस्वारांचा पाठलाग केला. तसेच त्यातील तिघांना अटक केली. आणखी एकाला त्यानंतर पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये राहुल विनोद सारवान (२५), रोहन कैलास डिकाव (२०), बलराम रामसिंग डिकाव (२०) रा. वाल्मीकी नगर अकोला, कुणाल मनोज निदाने (२५) शिवाजी नगर अकोला यांचा समावेश आहे. याप्रकरणी रणजित महेश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध कलम ३९५ नुसार गुन्हे दाखल केले. अन्य एक आरोपी पसार झाला आहे. पुढील तपास ठाणेदार मिर्झा यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक पांडे करीत आहेत.

Web Title: The robbers rob the truck driver