शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

दरोडेखोरांची मोठी टोळी जेरबंद; खदान पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 02:39 IST

गोरक्षण रोडवरील माधवनगरमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा दरोडेखोरांना खदान पोलिसांनी मंगळवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास रंगेहात अटक केली.

ठळक मुद्देदरोडा टाकण्याच्या तयारीत असताना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गोरक्षण रोडवरील माधवनगरमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा दरोडेखोरांना खदान पोलिसांनी मंगळवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास रंगेहात अटक केली. हे दरोडेखोर पोलिसांना पाहून अंधारात लपल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली असून, त्यांच्याकडून चाकू, दोरी, मिरची पूड, तलवार व दरोडा टाकण्यात वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले. खदानचे ठाणेदार संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शशिकांत नावकर व त्यांचे सहकारी मंगळवारी रात्री गस्तीवर असताना माधवनगरमध्ये अंधाराचा आडोसा घेऊन काही संशयित त्यांना लपताना दिसून आले. पोलिसांनी त्यांचे वाहन थांबवून या सहा संशयितांचा पाठलाग केला व त्यांना ताब्यात घेतले. यामध्ये महेश एकनाथ करोडदे, ज्ञानेश्‍वर विजय करोडदे, (अंबाशी, पातूर) व शुभम पंढरी मुंडे, वासुदेव ज्ञानेश्‍वर पुंडे, अविनाश मेघश्याम मल्लेवार, (सर्व रा. बालाघाट मध्य प्रदेश) या सहा जणांचा समावेश आहे, तर मलकापूर परिसरातील रहिवासी असलेला संजय अशोक जायले हा पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी पकडलेल्या संशयितांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याजवळ दोरी, मिरची पूड, स्क्रू ड्रायव्हर, टॉमी असे घर फोडण्याचे साहित्य जप्त केले. घटनास्थळाच्या बाजूलाच टाटा इंडिका विस्टा ही गाडी उभी होती. या संदर्भात पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता, या आरोपींमधीलच महेश करोडदे याने वाहन त्याच्या मालकीचे असल्याचे सांगितले. यावरून कारची तपासणी केली असता, या कारमध्ये तलवार, लोखंडी पाइप, टॉमी आढळली. हे सहा जण शहरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. खदानचे ठाणेदार संतोष महल्ले व त्यांच्या पथकाने रात्र गस्तीत केलेल्या या कारवाईमुळे मोठी अनुचित घटना टळल्याचे दिसून आले. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली असून, फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे. ठाणेदार संतोष महाले यांच्या मार्गदर्शनात पोलीस तपास करीत आहेत. या आरोपींनी यापूर्वी कुठे-कुठे दरोडे टाकले, याविषयीची माहिती पोलीस कोठडीदरम्यान समोर येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Khadan Police Stationखदान पोलीस स्टेशनCrimeगुन्हाAkola cityअकोला शहरGaurakshan Roadगौरक्षण रोड