पती, पत्नी आणि ‘ती’चा रोड-शो!
By Admin | Updated: August 3, 2016 01:47 IST2016-08-03T01:47:55+5:302016-08-03T01:47:55+5:30
पोलिसाची प्रेमकहाणी : परिचारिका पत्नीने केली दोघांचीही रस्त्यावर धुलाई.

पती, पत्नी आणि ‘ती’चा रोड-शो!
सचिन राऊत / अकोला
खाकी वर्दीतील पोलीस कर्मचारी..खाकी वर्दीतच महिला पोलीस कर्मचारी..परिचारिकेच्या वेशभुषेत असलेली एक महिला..या दोघांना वर्दीवर असताना मारहाण करते..खाकीचा धाक असतानाही हे दोघे एका महिलेकडून मान खाली करून मार खातात..बाळापूर रोडवरील बाळापूर नाक्यानजीक भररस्त्यावर हा प्रकार..एक प्रकारचा सिनेस्टाइल रोड शो..आणि हे पाहण्यासाठी बघ्यांची प्रचंड गर्दी..पत्नी घरात असताना प्रेमीकेसोबत गुलछऽरे उडविणार्या पोलीस पतीला आणि त्याच्या पोलीस प्रेयसीला त्याच्या पत्नीने मंगळवारी दुपारी २ वाजता ह्यगुलाबी प्रसादह्ण दिला.
पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचार्याला पत्नी व मुले आहेत. या पोलीस कर्मचार्याची पत्नी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत आहे. पोलीस कर्मचारी रात्रं-दिवस कर्तव्यावर असताना त्याच्यासोबतच एक महिला पोलीस कर्मचारीही कार्यरत आहे. कर्तव्यावर सोबत असताना या दोघांची ह्यघट्टह्ण ओळख झाली. ओळखीनंतर मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांकडे कानाडोळा करीत एखाद्या प्रेमीयुगलाप्रमाणे भेटी-गाठी सुरू केल्या. पोलीस पतीची वागणूक परिचारिका पत्नीच्या लक्षात येत होती; मात्र तिने दुर्लक्ष केले. परिचारिका पत्नी रुग्णालयात कामकाजासाठी जात असताना तिला पती व त्याची प्रेयसी हे दोघेही दुचाकीवर फिरताना दिसले. त्यानंतर पत्नीने या दोघांवर पाळत ठेवली. मंगळवारी दुपारी पोलीस पती आणि त्याची पोलीस प्रेयसी हे दोघेही बाळापूर रोडने जात असताना पोलिसाच्या पत्नीने तिचा भाऊ आणि कुटुंबीयांना सोबत घेऊन या दोघांना गाठले.
त्यानंतर बाळापूर नाक्यावर भररस्त्यावरच दोघेही वर्दीत असताना त्यांना चांगलाच चोप दिला. पत्नी, मुलांकडे दुर्लक्ष करीत प्रेमासाठी वाट्टेल ते करणार्या पतीला पत्नीने कानशीलात लगावली. त्यानंतर सदर महिला पोलीस कर्मचार्याच्याही ह्यझिपोट्याह्ण ओढल्या. या दोघांना जुने शहर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या मागोमाग पत्नीही पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या मध्यस्थीनंतर हा प्रकार सामोपचाराने मिटविण्यात आला.
खाकी वर्दीचे रस्त्यावर धिंडवडे
गैरकृत्य करणार्याच्या मनात धडकी भरविणार्या खाकी वर्दीचे मंगळवारी भर रस्त्यावर धिंडवडे निघाले. प्रेमात आंधळे झालेल्या दोघांनी पोलिसांची शान असलेल्या वर्दीचा शेकडो लोकांसमोर अवमान केल्याच्या प्रतिक्रिया यावेळी नागरिकांकडून व्यक्त झाल्या.
दीड तास वाहतूक विस्कळीत
रस्त्यावरील मंदिरासमोर हा प्रकार सुरू असल्याने या रोडवरून ये-जा करणार्यांची मोठी गर्दी वाढली. काही वेळातच वाहतूकही विस्कळीत झाली. तब्बल दोन तास हा प्रकार सुरू असल्याने जुने शहर पोलीस स्टेशनचे वाहन घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी दोघांनाही ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेले. या प्रकारामुळे वाहतूक बराच वेळ विस्कळीत झाली होती.