गोळेगाव येथे रस्त्याचे काम निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:17 IST2021-04-15T04:17:47+5:302021-04-15T04:17:47+5:30

आलेगाव : ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गोळेगाव येथील श्री महादेव संस्थानच्या क वर्ग तीर्थक्षेत्र येथे विकास निधीतून रस्त्याचे काम करण्यात ...

Road work in Golegaon is inferior | गोळेगाव येथे रस्त्याचे काम निकृष्ट

गोळेगाव येथे रस्त्याचे काम निकृष्ट

आलेगाव : ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गोळेगाव येथील श्री महादेव संस्थानच्या क वर्ग तीर्थक्षेत्र येथे विकास निधीतून रस्त्याचे काम करण्यात आले. या रस्त्याच्या कामात अनियमितता झाली असून, रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करीत संबंधित कंत्राटदाराचे देयक अदा करू नये, अशी मागणी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी बीडीओंकडे दिलेल्या तक्रारीतून केली आहे.

संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, गोळेगाव येथील श्री महादेव मंदिर संस्थानमध्ये रस्त्याचे काम करण्यात आले, परंतु या रस्त्याचे नियमानुसार खोदकाम आणि दबाई न करता तसेच करण्यात आले आहे. जाड गिट्टीचा वापर करण्यात आलेला नाही. तसेच १२५ मीटरपर्यंत आधीच्या डांबर रस्त्यावरच काँक्रीटीकरण करण्यात आले. त्यामुळे नियमानुसार रस्त्याचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत संबंधित कंत्राटदाराचे बिल अदा करू नये, अभी मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे. याबाबत ग्रामसेवक नंदू साळुंखे यांना विचारणा केली असता त्यांनी रजेवर असल्यामुळे या प्रकरणात काही बोलू शकत नाही, असे सांगितले.

Web Title: Road work in Golegaon is inferior