Cornavirus in Akola आणखी ४५ पॉझिटिव्ह, २४ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 06:24 PM2020-11-24T18:24:56+5:302020-11-24T18:25:36+5:30

आणखी ४५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ९१२० वर गेली आ

rnavirus in Akola 45 more positive, 24 corona free | Cornavirus in Akola आणखी ४५ पॉझिटिव्ह, २४ जण कोरोनामुक्त

Cornavirus in Akola आणखी ४५ पॉझिटिव्ह, २४ जण कोरोनामुक्त

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आलेख पुन्हा उंचावत असून, मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ४५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ९१२० वर गेली आहे. दरम्यान, आणखी २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ६२२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ५८७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये राम नगर व सहकार नगर येथील प्रत्येकी तीन, मलकापूर, तापडीया नगर व कौलखेड येथील प्रत्येकी दोन, सुधीर कॉलनी, पातूर, मोठी उमरी, चोहट्टा बाजार, जवाहर रोड, बहिणाबाई खरोटे कन्या विद्यालय, उमरी, पळसोबढे, जठारपेठ, देवरावबाबा चाळ, अकोट, गजानन महाराज मंदिर खदान, बाळापूर, पारस, रामदासपेठ, गोरक्षण रोड, देशमुख फैल, रणपिसे नगर, चिंचोली ता. बाळापूर, सिंधी कॅम्प, जोगळेकर प्लॉट व सांगवी बाजार येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी परिवार कॉलनी व अकोट फैल येथील प्रत्येकी दोन, रिंग रोड, गोकूळ कॉलनी, शिवाजी नगर, जठारपेठ, विद्युत नगर, सिंधी कॅम्प व शंकर नगर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

२४ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १२, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून एक, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले नऊ, अशा एकूण २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे

 

५०३ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९,१२० जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८३२९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५०३ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: rnavirus in Akola 45 more positive, 24 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.