१६ लाख जनावरांना ‘समर फिव्हर’चा धोका

By Admin | Updated: May 7, 2015 01:48 IST2015-05-06T00:28:09+5:302015-05-07T01:48:00+5:30

पश्‍चिम व-हाडात उन्हाचा पारा वाढला; तळपत्या उन्हाचा पशुधनाला फटका.

The risk of 'summer future' to 16 lakh animals | १६ लाख जनावरांना ‘समर फिव्हर’चा धोका

१६ लाख जनावरांना ‘समर फिव्हर’चा धोका

ब्रह्मनंद जाधव /मेहकर : पश्‍चिम वर्‍हाडात आधीच दुष्काळाचे सावट गडद झालेले आहे. त्यात उन्हाचा पाराही उच्चांक गाठत आहे. पश्‍चिम वर्‍हाडातील कमाल तापमान ४0 अंश सेल्सिअसच्यावर जात असल्याने १६ लाख जनावरांना 'समर फिव्हर'चा धोका निर्माण झाला आहे. तळपत्या उन्हाचा पशुधनाला फटका बसत असून, मुके प्राणी यात होरपळून निघत आहेत. पश्‍चिम वर्‍हाडातील बुलडाणा, अकोला व वाशिम जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. उन्हापासून मानव विविध मार्गांंनी आपला बचाव करून घेऊ शकतात; परंतु जनावरांना या कडाक्याच्या उन्हाचा फटका बसत आहे. चारा व पाणीटंचाईमुळे पश्‍चिम वर्‍हाडातील जनावरांची रानोमाळ भटकंती सुरू आहे. त्यात पाण्याची व ओल्या चार्‍याची कमतरता असल्याने जनावरांवर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. अकोला जिल्ह्यात २ लाख ७७ हजार ८८१, वाशिम जिल्ह्यात ३ लाख ४ हजार ३४७ तर बुलडाणा जिल्ह्यात १0 लाख १३ हजार ६८८ जनावरे आहेत. उन्हाच्या तीव्रतेने या जनावरांची प्रजनन क्षमता कमी होणे, वजन घटणे, अतिप्रखर सूर्यप्रकाशामुळे जनावरांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. पश्‍चिम वर्‍हाडातील कमाल तापमान ४0 अंश सेल्सिअसच्यावर जात असल्याने जनावरांना 'समर फिव्हर'चा धोका निर्माण झाला आहे. पश्‍चिम वर्‍हाडात असलेल्या एकूण १५ लाख ९५ हजार ९१६ जनावरांपैकी चारा व पाण्याच्या शोधात अनेक जनावरांना 'समर फिव्हर'चा फटका बसत आहे.

Web Title: The risk of 'summer future' to 16 lakh animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.