ऋषिकेश श्रीवास महाराष्ट्र हॉकी संघात
By Admin | Updated: May 9, 2016 02:17 IST2016-05-09T02:17:21+5:302016-05-09T02:17:21+5:30
मणिपूरमधील इम्फाळ येथे आयोजित राष्ट्रीय हॉकी स्पर्धेकरिता निवड.

ऋषिकेश श्रीवास महाराष्ट्र हॉकी संघात
अकोला: मणिपूरमधील इम्फाळ येथे ८ ते १६ मे या कालावधीत आयोजित राष्ट्रीय हॉकी स्पर्धेकरिता अकोला येथील ऋषिकेश आनंद श्रीवास याची निवड झाली आहे. ऋषिकेश स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. पुणे येथे २७ ते ३0 मार्च या कालावधीत महाराष्ट्र हॉकी असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र संघ निवड चाचणी आयोजित केली होती. यामध्ये ३00 खेळाडू सहभागी झाले होते. यामधून नोएल स्कूलचा विद्यार्थी व अकोला हॉकी असोसिएशनचा खेळाडू ऋषिकेश श्रीवास याने उत्कृष्ट खेळप्रदर्शन करीत महाराष्ट्र संघात आपले स्थान निश्चित केले. महाराष्ट्र संघाचे राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर २७ एप्रिल ते ७ मे या कालावधीत पुणे येथे आयोजत केले होते. ऋषिकेशने याआधी राष्ट्रीय व राज्यस्तर हॉकी स्पर्धा गाजविल्या आहेत. मुख्याध्यापिका अर्पणा डोंगरे, अनुष मनवर, अनुल मनवर, मनोज खंडारे, श्रीधर पिंपळकर, क्रीडा शिक्षक शरद पवार, हॉकी संघटनेचे सचिव संजय बैस, नरेंद्र चव्हाण, गुरू मित गोसल, धीरज चव्हाण आदींचे मार्गदर्शन ऋषिकेशला लाभले.