माहिती अधिकार कायद्यामुळे शासकीय कामात पारदर्शकता!
By Admin | Updated: November 17, 2014 01:27 IST2014-11-17T01:27:16+5:302014-11-17T01:27:16+5:30
पत्रकार दिनानिमित्त परिसंवादात निवासी उपजिल्हाधिकार्यांचे प्रतिपादन.

माहिती अधिकार कायद्यामुळे शासकीय कामात पारदर्शकता!
अकोला: माहितीचा अधिकार कायद्यामुळे जनता सजग झाली असून, शासकीय कामात मोठय़ा प्रमाणात पारदर्शकता आली आहे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी रविवारी केले.
राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार भवन येथे आयोजित ह्यसार्वजनिक कामकाजात पारदर्शकता : माध्यमांची भूमिकाह्ण या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर खोकले होते. यावेळी प्रा.डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, मराठी पत्रकार परिषद (मुंबई)चे कोषाध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस शौकतअली मिरसाहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे खंडागळे म्हणाले की, शासनाच्या कामात ई-टेंडरिंग, ई-गर्व्हनस्, ई-नोटीफिकेशन, ई-म्युटीशेन, ई-चावडी यासारख्या प्रशासकीय कामकाजाला गती देणार्या कामकाजामुळे प्रशासनात कामाचा वेग वाढला आहे. तसेच कामकाजातील पारदर्शकताही वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.भविष्यात लोकसेवक कायदा यासारख्या कायद्यामुळे शासकीय कामात अधिकाधिक कार्यक्षमता वाढणार असून, शासकीय कामकाज अधिक पारदर्शक होणार असल्याचा विश्वास खंडागळे यांनी व्यक्त केला. प्रसार माध्यम हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, सामान्य नागरिकांना अधिक सजग करण्याचे काम प्रसार माध्यमांकडून होत असल्याचे प्रा.डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी यावेळी सांगितले.