शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोरी भोवली; अशोक ओळंबे भाजपातून सहा वर्षांसाठी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 12:29 IST

भाजपचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी सायंकाळी डॉ. ओळंबे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्याचे पत्र जारी केले.

अकोला : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार आ. गोवर्धन शर्मा यांच्या विरोधात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य डॉ. अशोक ओळंबे यांनी शुक्रवारी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने उमेदवारी अर्ज सादर केला. याप्रकरणी भाजपचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी सायंकाळी डॉ. ओळंबे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्याचे पत्र जारी केले.

निमित्त ओळंबेंचे, लक्ष्य पालकमंत्री!अकोला जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे व पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, असे दोन गट असल्याचे सर्वश्रृत आहे. या दोन्ही गटांमध्ये सतत कुरघोडीचे राजकारण सुरु असते. डॉ. ओळंबे यांच्या निलंबनाच्या निमित्ताने याच कुरघोडीची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. डॉ. ओळंबे हे पालकमंत्र्यांचे समर्थक आहेत. त्यांनी अकोला पश्चिममध्ये अर्ज दाखल करुन खासदार गटाला संधी दिली. त्या संधीचा फायदा उठवित ओळंबे यांचे पक्षातून तात्काळ निलंबन करण्यात आले. या संपुर्ण प्रकारात ओळंबेंच्या माध्यमातून पालकमंत्र्यांनाच पुन्हा एकदा लक्ष्य करण्यात आले आहे.

बंडखोर गव्हाणकर, नाचणे यांना अभय का? अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करणाऱ्या ओळंबे यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करणाºया भाजपने बाळापूरात बंडखोरी करणारे माजी आ. नारायण गव्हाणकर, मूर्तिजापूरमधील बंडखोर पक्षाचे तालुका सरचिटणीस राजकुमार नाचणे यांच्यावर मात्र कारवाईचा बडगा उचललेला नाही. त्यामुळे या दोन बंडखोरांना अभय का ?, असा प्रश्न निष्ठांवत भाजप कार्यकर्त्यांकडून उपस्थित होत आहे.

मला निलंबित करण्याचा कवडीचाही अधिकार महानगराध्यक्षांना नसून, तो प्रदेशाध्यक्षांना आहे. अकोल्यात भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा आवाज नेहमीच दाबण्याचा प्रयत्न होतो. निलंबनाचे पत्रदेखील दबावतंत्राचा भाग आहे. त्यांच्या पदाचा व अधिकारांचा हा गैरवापर आहे. 

- डॉ. अशोक ओळंबे

टॅग्स :AkolaअकोलाBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019