शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अधिस्विकृती समिती मार्चमध्ये घेणार कृषी विद्यापीठांचा आढावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 14:39 IST

अकोला: राज्यातील कृषी विद्यापीठाच्या शिक्षण,संशोधन व विस्तार कार्याचा दर्जा घसरल्याने भारतीय कृषी संशोधन (आयसीएआरअ‍ॅक्रीडेशन कमेटी)परिषदेच्या केंद्रीय अधिस्विकृती समितीने दोन वर्षासाठी कृषी विद्यापीठांचे मानांकन रद्द केले होते, आता येत्या मार्च महिन्यात ही समिती येणार असून,पुन्हा आढावा घेणार असल्याने कृषी विद्यापीठांनी जय्यत तयारी केली आहे.

ठळक मुद्देअकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी प्रचंड मागे पडले असून, पहिल्या दहा क्रमांकात राहणारे हे विद्यापीठ मानाकंनात ४८ व्या क्रमाकांवर पोहोचले होते ही अधिस्वीकृती हटवून कृषी विद्यापीठांना संशोधनासाठीचा निधी मिळावा, यासाठीचे प्रयत्न शासनाकरवी करण्यात आले होते.कृषी विद्यापीठांसह खासगी ‘ड’ वर्गातील कृषी महाविद्यालयांचा शिक्षणाचा दर्जा सुधारण्यात यश आल्याचा दावा कृषी विद्यापीठांकडून केला जात आहे.

- राजरत्न सिरसाट

अकोला: राज्यातील कृषी विद्यापीठाच्या शिक्षण,संशोधन व विस्तार कार्याचा दर्जा घसरल्याने भारतीय कृषी संशोधन (आयसीएआरअ‍ॅक्रीडेशन कमेटी)परिषदेच्या केंद्रीय अधिस्विकृती समितीने दोन वर्षासाठी कृषी विद्यापीठांचे मानांकन रद्द केले होते, आता येत्या मार्च महिन्यात ही समिती येणार असून,पुन्हा आढावा घेणार असल्याने कृषी विद्यापीठांनी जय्यत तयारी केली आहे. दरम्यान, मागचा अनुभव बघता यावेळी कृषी विद्यापीठाचा दर्जा सुधारल्याचा दावा करण्यात येत आहे.२०१४ पर्यंत राज्यात खासगी कृषी महाविद्यालयांची संख्या भरमसाठ वाढली; पण कृषी विद्यापीठांची संचालक, विभागप्रमुख, प्राध्यापक आदी अर्ध्याच्या वर पदे रिक्त होती. शासनाने पदेच न भरल्याने शिक्षण, संशोधन व कृषी विस्तार कार्याचा ताण हा अपूर्ण मनुष्यबळावर पडला. कृषी विद्यापीठाचे शासकीय महाविद्यालय तसेच खासगी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा, उत्तरपत्रिका तपासणी आदी अतिरिक्त कामे करावी लागत असल्याने शैक्षणिक गुणवत्ता ढासळली, संशोधनावरही परिणाम झाले. आयसीएआरच्या अधिस्वीकृती समितीला मागच्या दोनवर्षापुर्वी हे सर्व ठळकपणे दिसले. अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी प्रचंड मागे पडले असून, पहिल्या दहा क्रमांकात राहणारे हे विद्यापीठ मानाकंनात ४८ व्या क्रमाकांवर पोहोचले होते.म्हणूनच आयसीआरने या कृषी विद्यापीठांची अधिस्वीकृती रद्द केली होती. त्याचे चांगलेच पडसाद उमटले होते. ही अधिस्वीकृती हटवून कृषी विद्यापीठांना संशोधनासाठीचा निधी मिळावा, यासाठीचे प्रयत्न शासनाकरवी करण्यात आले होते. त्याला काही प्रमाणात यशही आले. त्यांनतर राज्यातील कृषी विद्यापीठांची संचालक,अधिष्ठाता,सहयोगी अधिष्ठाता व प्राध्यापकांची रिक्तेपदे भरण्यात आली असून, ३५० प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक म्हणून करीअर अ‍ॅडव्हान्स स्कीम अंतर्गत बढती देण्यात आली.१५० पदे बढती व थेट भरतीव्दारे भरण्यात आली असून,कृषी विद्यापीठांसह खासगी ‘ड’ वर्गातील कृषी महाविद्यालयांचा शिक्षणाचा दर्जा सुधारण्यात यश आल्याचा दावा कृषी विद्यापीठांकडून केला जात आहे.कृषी विद्यापीठांच्या रिक्त जागा भरण्यात आल्या असून, शिक्षण,संशोधन व विस्तार कार्याचा दर्जा सुधारला आहे. येत्या मार्च महिन्यात अधिस्विकृती येणार आहे.त्यांच्यापुढे सविस्तर माहिती मांडण्यात येणार आहे.- डॉ. राम खर्चे ,उपाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद,पुणे.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ