मनपासह महसूल पथके सुस्तावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:13 IST2021-07-05T04:13:30+5:302021-07-05T04:13:30+5:30
एसटी बसमध्ये विनामास्क प्रवास अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असतानाही एसटी बसमध्ये प्रवाशांकडून मास्कचा वापर होताना दिसून येत ...

मनपासह महसूल पथके सुस्तावली
एसटी बसमध्ये विनामास्क प्रवास
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असतानाही एसटी बसमध्ये प्रवाशांकडून मास्कचा वापर होताना दिसून येत नाही. विनामास्क प्रवास आणि फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा ही स्थिती कोरोना संसर्गासाठी पोषक ठरत आहे.
जिल्हा रुग्णालय परिसरात उघड्यावर कचरा
अकोला : जिल्हा स्त्री रुग्णालयातील वॉर्डांमध्ये स्वच्छता राखण्यात येत असली तरी प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांच्या नातेवाइकांकडून रुग्णालय परिसरातच अस्वच्छता केली जात असल्याचे दिसून येते, शिवाय रुग्णालयातील कचराही उघड्यावरच टाकण्यात येत असल्याने या ठिकाणी अस्वच्छता निर्माण झाली आहे.
निधीअभावी अटल अर्थसाहाय्य योजना रखडली
अकोला : सहकारी संस्थांच्या व्यावसायिकतेला चालना देत शेतीपूरक उद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी सहकार विकास महामंडळाने अटल पणन अर्थसाहाय्य योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत जिल्ह्यात ३४ संस्थांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यांना नऊ कोटी ६६ लाख रुपये मंजूर झाले होते; मात्र तीन वर्षे होऊनही या योजनेला निधी मिळत नसल्याने योजना रखडली आहे.