महसूल मंत्री खडसे यांची शनिमंदिराला भेट
By Admin | Updated: November 8, 2014 23:19 IST2014-11-08T23:19:31+5:302014-11-08T23:19:31+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील शनिमंदीरास अचानक भेटीने मंदिर प्रशासन व कार्यकर्त्यांची उडाली धावपळ.

महसूल मंत्री खडसे यांची शनिमंदिराला भेट
बुलडाणा : राज्याचे महसूल मंत्री ना. एकनाथराव खडसे यांनी शनिवार ८ नोव्हेंबर रोजी नांदूरा तालुक्यातील टाकरखेड येथील शनि मंदिराला भेट दिली. ना.खडसे हे अचानक टाकरखेड येथे आल्यामुळे मंदिर प्रशासन व कार्यकर्त्यांची एकच धावपळ झाली.
आज शनिवार असल्यामुळे शनिमंदिरावर भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. अशातच आज ना.खडसे हे दर्शनासाठी आपल्या लवाजमासह दाखल झाले. त्यांच्या सोबत भाजपचे घनशामदास गांधी, बुलडाणा नगराध्यक्ष टि.डी.अंभोरे पाटील, मोताळ्याचे एकनाथ खर्चे, सुनिल उदयकार आदी उपस्थित होते. ना.खडसे हे दर्शन घेऊन जवळपास एक तास मंदिरावर थांबले. त्यानंतर शेंबा येथील आर.एम. सुपे यांच्याकडे भेट दिली. यावेळी मोठय़ा प्रमाणावर कार्यकर्ते व नागरिक जमा झाल्याने शेंबा येथील शाळेवर त्यांनी कार्यकर्त्यांशी विविध समस्यांवर चर्चा केली.