महसूल, पोलिस अधिकार्‍यांनी केली गोदामाची पाहणी

By Admin | Updated: August 31, 2014 01:16 IST2014-08-31T01:15:57+5:302014-08-31T01:16:59+5:30

अकोला जिल्हा प्रशासनाकडून विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी.

Revenue, Inspectorate of Police Inspector of Police | महसूल, पोलिस अधिकार्‍यांनी केली गोदामाची पाहणी

महसूल, पोलिस अधिकार्‍यांनी केली गोदामाची पाहणी

अकोला : विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून, प्रशासनामार्फत निवडणुकीची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये शनिवारी अकोला पूर्व आणि अकोला पश्‍चिम या दोन विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी व्यवस्थेची पूर्वतयारी म्हणून महसूल व पोलिस विभागाच्या अधिकार्‍यांनी खदानस्थित शासकीय धान्य गोदामाची पाहणी केली.
अकोला पूर्व व अकोला पश्‍चिम या दोन विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी खदानस्थित शासकीय धान्य गोदामात करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने अकोल्याचे उपविभागीय अधिकारी तथा अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे, उपजिल्हाधिकारी (महसूल) तथा अकोला पश्‍चिम मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश गावडे, तहसीलदार संतोष शिंदे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि मंडळ अधिकार्‍यांनी खदानस्थित शासकीय धान्य गोदाम येथे भेट देऊन गोदामांची पाहणी केली.
*अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करणार!
निवडणूक पूर्वतयारीमध्ये मतमोजणीची करण्यात आलेली पूर्वतयारी, त्यादृष्टीने करण्यात आलेली व्यवस्था याबाबत पाहणीचा अहवाल दोन दिवसात जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात येणार आहे. जिल्हाधिकार्‍यांमार्फत हा अहवाल राज्य निवडणूक अधिकार्‍यांकडे पाठविण्यात येणार आहे, असे अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी सांगितले.

Web Title: Revenue, Inspectorate of Police Inspector of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.