अकोला : विविध मागण्या मंजूर होत असल्यामुळे महसूल कर्मचार्यांनी १ जुलै रोजी काळ्या फिती लावून लावून काम केले. तसेच दुपारी निदर्शने करण्यात आली. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आपल्या मागण्या तत्काळ मंजूर करण्यात याव्यात या मागणीसाठी काळ्या फिती लावून काम करीत होते. नायब तहसीलदार पदाला राजपत्रित अधिकार्यांचा दर्जा देण्यात आला आहे; मात्र ग्रेड पे कमी देण्यात आला. त्यामुळे ग्रेड पे वाढवून ४६00 करण्यात यावा. महसूल विभागातील लिपिकाचे पदनाम बदलून त्याला महसूल सहाय्यक असे पदनाम करण्यात यावे, आदी मागण्या मंजूर करण्यासाठी कर्मचार्यांच्या वतीने काळ्या फिती लावून काम करण्यात आले.
महसूल कर्मचार्यांचे आंदोलन
By admin | Updated: July 2, 2014 00:30 IST