सेवानवृत्त शिक्षकांना मिळणार उपदानाचे ३२ कोटी

By Admin | Updated: August 12, 2014 21:53 IST2014-08-12T21:45:13+5:302014-08-12T21:53:35+5:30

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश; उच्च शिक्षण सचिवाने मागितली बिनशर्त माफी

Retired teachers get 32 ​​crores of subsidy | सेवानवृत्त शिक्षकांना मिळणार उपदानाचे ३२ कोटी

सेवानवृत्त शिक्षकांना मिळणार उपदानाचे ३२ कोटी

अकोला : सेवानवृत्त शिक्षकांना उपदानाचे (ग्रॅच्युईटी) ३२ कोटी रुपये देण्याचे आदेश सवरेच न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत. याप्रकरणी दिरंगाई करू न सवरेच न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी उच्च तंत्र शिक्षण सचिवांना सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफीही मागावी लागली.
जानेवारी २00६ ते ऑगस्ट २00९ या दरम्यान सेवानवृत्त झालेल्या शिक्षकांना पाचऐवजी सात लाख रुपये ग्रॅच्युईटी देण्यात यावी, यासाठी असोसिएशन ऑफ कॉलेज अँड युनिर्व्हसिटी सुपरअँन्युएटेड टिचर्सने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर ३0 जानेवारी २0१३ रोजी सवरेच न्यायालयाच्या न्या.जी.एस. सिंघवी आणि न्या. फकिर मो. कलिफुल्ला यांच्या खंडपीठाने असोसिएशनच्या बाजुने निकाल देत, सेवानवृत्त शिक्षकांना ७ लाख रूपये उपदान देण्याचे आदेश दिले; तथापि राज्य शासनाने आदेशाचे पालन न केल्यामुळे असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. शिक्षकांच्या बाजूने दिलेल्या निकालाची शासनाने दखल घेतली नाही. न्यायालयाचा हेतूपूर्वक आज्ञाभंग करू न अवमान केल्यामुळे कारवाई का करण्यात असे येऊ नये, असे न्यायालयाने राज्य शासनाला बजावले. शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सचिवांनी ४ जुलै रोजी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहून आपली बाजू मांडावे, असे न्यायालयाने फर्मावले. त्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण सचिव संजयकुमार यांनी न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली. याचिकाकर्त्यांच्या उपदानाचे ३२ कोटी चार आठवड्यात जमा करण्याचे प्रतिज्ञापत्रही त्यांनी न्यायालयात सादर केले.

Web Title: Retired teachers get 32 ​​crores of subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.