सेवानिवृत्त काेतवाल चिंचाेळकर यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:19 IST2021-01-03T04:19:35+5:302021-01-03T04:19:35+5:30

अकोट : तहसील कार्यालयातील सेवानिवृत्त काेतवाल रमेश चिंचोळकर यांचा तहसीलदार मडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला नायब ...

Retired Ketwal Chinchalkar felicitated | सेवानिवृत्त काेतवाल चिंचाेळकर यांचा सत्कार

सेवानिवृत्त काेतवाल चिंचाेळकर यांचा सत्कार

अकोट : तहसील कार्यालयातील सेवानिवृत्त काेतवाल रमेश चिंचोळकर यांचा तहसीलदार मडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला नायब तहसीलदार हरीश गुरव, परिविक्षाधीन तहसीलदार कोंडागुर्ले, विस्तार अधिकारी गजानन सावरकर व तहसील कार्यालय अकोट, उपविभागीय अधिकारी कार्यालय अकोट येथील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

.................................

किडींचा प्रादुर्भाव, तूर पीक धोक्यात

अकोट : कापसाची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने एकीकडे विक्रीकरिता शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे, तर दुसरीकडे तूर पीक धोक्यात आले आहे. वातावरणात थंडीचा जोर वाढल्याने पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव हाेत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

......................

ट्रेलरच्या अपघातात चालक, वाहक जखमी

बाळापूर : लाेखंडी सेंट्रिंग घेऊन बाळापूरकडे येत असलेल्या एचआर एल ९२१३ क्रमांकाच्या ट्रेलर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे रिधाेराजवळ गुरुवारी अपघात घडला. यामध्ये वाहक, चालक जखमी झाले. ट्रेलरच्या धडकेत पुलाचे संरक्षक कठडे तुटले; मात्र ट्रेलर पुलामध्ये अडकल्याने सुदैवाने माेठा अनर्थ टळला.

Web Title: Retired Ketwal Chinchalkar felicitated