अकोट तालुक्यात संचारबंदीला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:28 IST2021-02-23T04:28:01+5:302021-02-23T04:28:01+5:30

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने, हा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. संचारबंदीदरम्यान तालुक्यात ठिकठिकाणी ...

Response to curfew in Akot taluka | अकोट तालुक्यात संचारबंदीला प्रतिसाद

अकोट तालुक्यात संचारबंदीला प्रतिसाद

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने, हा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. संचारबंदीदरम्यान तालुक्यात ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून आला. कोरोना काळात नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्यात येत आहे. जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संचारबंदी लागू करण्यात आली असून, शहरासह तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकाने बंद असून, रस्ते ओस पडले होते. यावेळी प्रशासनामार्फत कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. (फोटो)

--------------------------

पणज येथे शुकशुकाट

अकोट तालुक्यातील ग्राम पणज येथे रविवारी दि.२१ फेब्रुवारी रोजी ग्रामस्थांनी संचारबंदीला प्रतिसाद देऊन गाव बंद केले होते. गावातील रस्ते, गल्ली, बोळात शुकशुकाट असून, दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

Web Title: Response to curfew in Akot taluka