पशू आरोग्य शिबिरास प्रतिसाद; २६७ गुरांवरती उपचार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:22 IST2021-08-13T04:22:48+5:302021-08-13T04:22:48+5:30
शिबिराचे उद्घाटन पं. स. सदस्या शुभांगीताई गोपाळराव भटकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्ष सहयोगी अधिष्ठाता प्रा.डॉ. अनिल भिकाने, प्रा.डॉ. सुनील ...

पशू आरोग्य शिबिरास प्रतिसाद; २६७ गुरांवरती उपचार!
शिबिराचे उद्घाटन पं. स. सदस्या शुभांगीताई गोपाळराव भटकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्ष सहयोगी अधिष्ठाता प्रा.डॉ. अनिल भिकाने, प्रा.डॉ. सुनील वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी ज्ञानेश्वर माळी, गजानन चोपडे, माजी सरपंच गजानन वाघ, ग्रा.पं. सदस्य पांडुरंग भाकरे, गोपाळराव भटकर, गणेश भाकरे व मोतीराम डोंगरदिवे उपस्थित होते. शिबिरात २२२ गुरांचे, ४५ शेळ्या, ६ म्हशींचे लसीकरण व जंत निर्मूलन करण्यात आले. तसेच चार म्हशींची गर्भ निदान तपासणी अशा एकूण २६७ पशूंवरती उपचार करण्यात आले. शिबिरात पशुचिकित्सा संकुलाचे प्रमुख प्रा. डॉ. सुनील वाघमारे, डॉ. रत्नाकर राऊळकर, डॉ. महेश इंगवले व डॉ. प्रशांत कपले यांच्या मार्गदर्शनाखाली पदव्युत्तर विद्यार्थी डॉ. परीक्षित कातखडे, डॉ. अक्षय शिंदे, डॉ. पीयूष झोपे, डॉ. अक्षय दहातोंडे, डॉ. सचिन कदम, डॉ. प्रशांत अळणे यांनी उपचार केले. यशस्वीतेसाठी दत्तक ग्राम समन्वयक डॉ. एम. आर. वडे व माजी पशुधन पर्यवेक्षक आर. एफ. सैय्यद यांनी परिश्रम घेतले.