ठरावाला ठेंगा; फोर-जीचे खोदकाम सुरूच!
By Admin | Updated: September 7, 2014 01:38 IST2014-09-07T01:38:01+5:302014-09-07T01:38:01+5:30
अकोल्यात फोर जी केबलच्या खोदकामावर आक्षेप; नगरसेवक टाले यांची पोलिसात तक्रार.

ठरावाला ठेंगा; फोर-जीचे खोदकाम सुरूच!
अकोला : शहरात मनमानी पद्धतीने खोदकाम करून जलवाहिन्यांचा सत्यानाश करणार्या मोबाईल कंपन्यांचे खोदकाम बंद करण्याचा ठराव मनपाच्या सभागृहात घेण्यात आला हो ता. या ठरावाला ठेंगा दाखवत मोबाईल कंपन्यांनी खोदकाम करण्यासह जलवाहिन्यांची तोडफोड सुरूच ठेवल्याने संतप्त झालेल्या नगरसेवक बाळ टाले यांनी ५ खदान पोलिस ठाण्यात कंपनीविरोधात तक्रार दिली. या प्रकारामुळे कार्यकारी अभियंत्यांसह शहर अभियं त्यांची भूमिक ा संशयास्पद ठरत आहे. फोर-जी सुविधा पुरविण्यासाठी शहरात रिलायन्स व वोडाफोन या मोबाईल कंपन्यांच्याव तीने खोदकाम सुरू आहे; परंतु दोन्ही कंपन्यांनी खोदकामादरम्यान जलवाहिन्यांची मोठय़ा प्रमाणावर तोडफोड केल्याची वस्तुस्थिती आहे. शिवाय तोडलेल्या जलवाहिन्या दुरुस्तीसाठी कंपन्यांच्यावतीने टाळाटाळ होत असल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. असाच प्रकार २0 जुलै रोजी प्रभाग क्र.३१ मधील गोरक्षण रोड भागात घडल्याने संतप्त नागरिकांनी मोबाईल कंपन्यांच्या वाहनांची तोडफोड केली होती. दुसर्याच दिवशी २१ जुलै रोजी मनपाच्या सर्वसाधारण सभेने कंपन्यांचे खोदकाम बंद करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला होता. तरी सुद्धा प्रभाग क्र.३१ मध्ये मोबाईल कंपनीच्यावतीने खोदकाम करण्यात येऊन पुन्हा जलवाहिनी तोडल्याचा प्रकार ५ सप्टेंबर रोजी घडला. या प्रकारामुळे संतप्त झालेले भाजप नगरसेवक बाळ टाले यांनी कंपनी विरोधात खदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी मोबाईल कंपनीचे साहित्य व ट्रक ताब्यात घेतला. पंरतु, कंपनीच्या विरोधात ठोस पावले उचलण्यास मनपासह पोलिस प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप नगरसेवक टाले यांनी केला आहे.