पंदेकृवित होणार खारपणपट्टयावर संशोधन !

By Admin | Updated: February 17, 2015 00:45 IST2015-02-17T00:45:39+5:302015-02-17T00:45:39+5:30

लोकमत इम्पॅक्ट; एमसीईएआरचा महत्वपूर्ण निर्णय.

Research will be done on pocket salty belly! | पंदेकृवित होणार खारपणपट्टयावर संशोधन !

पंदेकृवित होणार खारपणपट्टयावर संशोधन !

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विदर्भातील शापित खारपाणपट्टय़ाच्या विकासासाठी स्वतंत्र संशोधन केंद्राचा प्रस्ताव भारतीय कृषी (आयसीएआर) संशोधन व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन (एमसीईएआर) परिषदेकडे पाठवला होता. या प्रस्तावावर एमसीईएआरने शुक्रवारी शिक्कामोर्तब केले असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला ह्यक्षारपड जमिन संशोधन केंद्रह्ण देण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी विद्यापीठात खारपाणपट्टय़ासाठी संशोधन केंद्र मिळावे, यासाठी लोकमतने हा मुद्दा वेळोवेळी प्रभावीपणे उचलून धरला, हे विशेष.
पश्‍चिम विदर्भातील पूर्णा नदीच्या पूर्व व पश्‍चिम अशा दोन्ही भागांनी साधारणत: ४0 ते ५0 किलोमीटर रुंद व १५५ कि.मी. लांब खारपाणपट्टा आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ८९२ गावं या खारपाणपट्टय़ात मोडतात. हे क्षेत्र सुमारे तीन लाख हेक्टर असून, इतर महसूल विभागांच्या तुलनेत अमरावती विभागातील सिंचन क्षेत्र १0 टक्क्य़ांचा आत आहे. भरिस भर खारपाणपट्टय़ाचा शाप या भागाला आहे. या खारपाणपट्टय़ातील माती चोपण असून, पाणी खारे आहे. या पाण्यात अनेक प्रकारचे क्षार असल्याने कृषिमाल उत्पादनावर त्याचा परिणाम तर होतोच, शिवाय मानवी आरोग्यालाही हे पाणी घातक असल्याने वर्षानुवर्षे त्याचे दुष्परिणाम या भागातील जनता सहन करीत आहे. उत्पादन कमी होत असल्याने त्याचा परिणाम शेतकर्‍यांच्या एकूण सामाजिक व आर्थिक स्तरावर झालेला आहे.
दरम्यान, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने या खारपाणपट्टय़ावर संशोधन करण्यासाठी स्वतंत्र केंद्र या विद्यापीठात देण्यात यावे, या मागणीचा प्रस्ताव डीसेंबर २0१३ व जानेवरी २0१५ मध्ये भारतीय कृषी संशोधन व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडे पाठविला होता.या पार्श्‍वभूमीवर कृषी विद्यापीठाच्या खारपाणपट्टा स्वतंत्र संशोधन केंद्राकडे या भागातील जनतेचे लक्ष लागले होते. यावेळी एमसीईएआरने या प्रस्तावाची दखल घेतली असून, शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी झालेल्या एमसीईएआरच्या महत्वपूर्ण बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दिलीप मानकर यांनी सांगीतले. या प्रस्तावावर एमसीईएआरने शिक्कामोतर्तब केले असून, शासनाकडे शिफारस केली आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठाला हे केंद्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: Research will be done on pocket salty belly!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.