शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

शौचालयांचा अहवाल सादर करण्यासाठी मागितली आठ दिवसांची मुदत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 1:38 PM

मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी शौचालयांचा अहवाल सादर करण्यासाठी आठ दिवसांची मुदत मागितली.

अकोला: महापालिका प्रशासनाने ‘जिओ टॅगिंग’ न करताच शहरात १८ हजारापेक्षा अधिक शौचालयांची उभारणी केली. या बदल्यात प्रशासनाने कंत्राटदारांच्या देयकांपोटी २९ कोटी रुपयांची उधळपट्टी केली. स्वच्छता विभागातील कर्मचारी व कंत्राटदारांनी केंद्र आणि राज्य शासनाला कोट्यवधी रुपयांनी चुना लावल्यानंतरही प्रशासन कारवाई करीत नसल्याचे पाहून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोºहे यांनी मनपाच्या संशयास्पद भूमिकेवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. त्यावर मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी शौचालयांचा अहवाल सादर करण्यासाठी आठ दिवसांची मुदत मागितली असता त्याला उपसभापती गोºहे यांनी संमती दिली.महापालिकेच्यावतीने पंतप्रधान आवास योजना, भूमिगत गटार योजना, पाणी पुरवठा वितरण प्रणालीत सुधारणा करण्याच्या अनुषंगाने जलवाहिनीचे जाळे टाकण्यासह रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. पंतप्रधान आवास योजनेत लाभार्थींना घराचे नकाशे मंजूर करण्यात दिरंगाई होत असल्याची स्थिती आहे. याचा परिणाम घर बांधणीवर होऊन लाभार्थींवर ताटकळत राहण्याची वेळ आली आहे. ‘अमृत’च्या भूमिगत गटार योजनेचे काम अतिशय दर्जाहीन व निकृष्ट होत असतानासुद्धा मनपा प्रशासनाकडून तपासणी न करताच कोट्यवधींच्या देयकांना मंजुरी दिली जात आहे. जलवाहिनीचे जाळे टाकताना सर्व निकष, नियम धाब्यावर बसवित जमिनीखाली अवघे दीड ते दोन फूट अंतर खोदून पाइपलाइन टाकल्या जात आहे. कंत्राटदाराने संपूर्ण शहरात खोदकाम केल्यानंतरही रस्त्यांची जाणीवपूर्वक दुरुस्ती केली जात नाही. यामुळे सर्वसामान्य अकोलेकर वैतागले आहेत. यासह वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय उभारणीत झालेला भ्रष्टाचार मनपा प्रशासनाच्या स्तरावर दडपून ठेवल्या जात असल्याच्या मुद्यावर विधान परिषद सदस्य गोपीकिशन बाजोरिया यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोºहे यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानुषंगाने मंगळवारी मुंबईत नीलम गोºहे यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. जोगेंद्र कवाडे, ना. गो. गाणारकर, हुस्ना खलीपे, मनपातील गटनेता राजेश मिश्रा, आयुक्त संजय कापडणीस, लेखाधिकारी मनजित गोरेगावकर, कार्यकारी अभियंता अजय गुजर, झोन अधिकारी प्रशांत राजूरकर यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.आयुक्त म्हणाले, माहिती घेऊन अहवाल सादर करतो!‘जिओ टॅगिंग’ न करताच शौचालय उभारून कंत्राटदारांच्या कोट्यवधीच्या देयकांना मंजुरी देण्यात आल्याची गंभीर दखल विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोºहे यांनी घेतली. याप्रकरणी आजवर कारवाई का केली नाही, असा सवाल गोºहे यांनी उपस्थित केला असता, सविस्तर माहिती घेऊन अहवाल सादर करण्याची विनंती मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी केली. पुढील बैठक २८ आॅगस्ट रोजी होणार आहे.आॅडिटमध्ये आक्षेप; कारवाईला ‘खो’महालेखाकार समिती तसेच औरंगाबाद येथील लेखाकार समितीकडून दरवर्षी मनपाच्या आर्थिक कामकाजाचे लेखापरीक्षण केले जाते. यादरम्यान, महालेखाकार समितीने रिलायन्सला तीन कोटी रुपये माफ करण्यावर आक्षेप नोंदवला. प्रशासनाने मालमत्ता पुनर्मूल्यांकनाच्या निविदेत चूक केल्यामुळे मनपाच्या तिजोरीवर वार्षिक दीड कोटींचा नाहक बोजा पडणार आहे. यावर महालेखाकार समितीने आक्षेप नोंदविला. ‘जिओ टॅगिंग’ करूनच शौचालयांची बांधणी करणे व त्यानंतर देयक अदा करणे भाग असताना मनपाने ‘जिओ टॅगिंग’ न करताच देयक अदा केल्याचा मुद्दा आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी मांडला.पालकमंत्र्यांच्या निर्देशाला केराची टोपलीशौचालयांच्या प्रकरणात केंद्र व राज्य शासनाच्या निधीवर डल्ला मारण्यात आल्याची बाब गंभीरतेने घेत तत्कालीन नगर विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांना १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश जानेवारी महिन्यात मुंबई येथे आढावा बैठकीत दिले होते. मनपा प्रशासनाने आठ महिन्यांतही अहवाल सादर केला नाही, हे येथे उल्लेखनीय.

 

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोला