चंद्राई व्यसनमुक्ती केंद्रातर्फे प्रजासत्ताक दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:14 IST2021-02-05T06:14:52+5:302021-02-05T06:14:52+5:30
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष विनोंद बावणेर, सचिव छाया बावणेर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटन ...

चंद्राई व्यसनमुक्ती केंद्रातर्फे प्रजासत्ताक दिन
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष विनोंद बावणेर, सचिव छाया बावणेर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटन सचिव रवी राठी, निजामुद्दीन इंजिनिअर, बोरकर उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजनाने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच भारताचे संविधानाचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेचे प्रकल्प संचालक अपर्णा बोधलकर, संस्थेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मोरे, समुपदेशक विजय प्रभे, आशिष मोहोड, अंकुश काळे, सुमेधकुमार गवई, किरण बोरीकर, शालू उमक, पद्मा थोरात, लता भोयर, कल्पना पवार आदी उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद विद्यालयात ध्वजारोहण
मूर्तिजापूर: सिरसो येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात मंगळवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.
संस्थेचे सदस्य अशोक अव्वलवार यांच्या हस्ते, संस्थेचे सचिव पी. एम. पाटील यांचे अध्यक्षतेखाली व संस्थाध्यक्ष आर. एस. कुर्मी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले,. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पुष्पलता वानखडे, संस्थेचे पदाधिकारी प्रल्हादराव नवघरे, संजय सुफले, कंडारे, निवृत्त मुख्याध्यापक सोपान ढाकुलकर, शिक्षक सुभाष खरतडकर, शिपायी हरिचंद्र लोखंडे उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक रणजित इंगोले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यास प्रतापकुमार गावंडे, विलास कथले, गजानन कोकाटे, अनिल ढगे, कमल कुर्मी यांनी परिश्रम घेतले.
फोटो: