वरली-मटक्याच्या अड्डय़ावर छापा, दोघांविरुद्ध कारवाई.
By Admin | Updated: December 10, 2014 01:22 IST2014-12-10T01:22:24+5:302014-12-10T01:22:24+5:30
आकोटात दोन ठिकाणी जुगारावर धाड; सट्टापट्टी साहित्य व दोन हजार रुपये नगदी जप्त.

वरली-मटक्याच्या अड्डय़ावर छापा, दोघांविरुद्ध कारवाई.
आकोट (अकोला): आकोट शहर पोलिसांनी दोन ठिकाणी जुगारावर धाड टाकून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस सूत्रांनुसार, बस स्थानकासमोर ८ डिसेंबरला दुपारी ३ वाजताच्या सुमारास पंजाब गणपत देवर (६0 रा. पिंपळखुटा) हा लोकांकडून वरली-मटक्याच्या आकड्यावर पैसे घेऊन खायवाडी करीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सट्टापट्टी साहित्य व दोन हजार रुपये नगदी जप्त केले.
सदर इसमाविरुद्ध हेडकॉन्स्टेबल कैलास सानप यांनी दिलेल्या तक्रारीवरून १२ मुंबई जुगार अँक्टनुसार कारवाई करण्यात आली. दुसर्या घटनेत शिवाजी चौकामध्ये ४.३0 वाजताच्या सुमारास संजय शालीग्राम सिरसाट (४५ रा. नरसिंग महाराज मंदिरजवळ, आकोट) हा वरली-मटक्याच्या आकड्यावर लोकांकडून पैशाची खायवाडी करताना आढळून आला. त्याच्याजवळून सट्टापट्टी साहित्य व ५६५ रुपये नगदी जप्त करण्यात आले. हेडकॉन्स्टेबल दिलीप महल्ले यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध १२ मुंबई जुगार अँक्ट अन्वये कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास आकोट शहर पोलिस करीत आहेत.