दुबईतून अकोल्यात आलेल्या एका युवतीचाअहवाल पॉझिटिव्ह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 18:42 IST2021-12-20T18:39:10+5:302021-12-20T18:42:09+5:30
CoronaVirus in Akola : दुबईतून आलेल्या एका रुग्णाचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.

दुबईतून अकोल्यात आलेल्या एका युवतीचाअहवाल पॉझिटिव्ह!
अकोला: दुबईतून अकोल्यात आलेल्या एका युवतीचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अकोलेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. ‘ओमायक्रॉन’च्या निदानासाठी रुग्णाचे ‘आरएनए’ सॅम्पल पुण्याला पाठविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. रुग्ण गृहविलगीकरणात असून कोरोनाचे कुठलेही लक्षणे नसल्याची माहिती आहे. राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची वाढती संख्या धडकी भरवणारी आहे. अशातच गत आठवड्यात शेजारील बुलडाणा जिल्ह्यात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला होता. या घटनेला आठवडा होत नाही, तोच अकोल्यात दुबईतून आलेल्या एका रुग्णाचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. रुग्ण एक युवती असून ती महापालिका क्षेत्रातील रहिवासी आहे. शनिवारी रुग्णाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. रविवारी रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले. कुठल्याही प्रकारचे लक्षणं नसल्याने रुग्णाला गृहविलगीकरणात ठेवण्यात आले. रुग्णाचे ‘आरएनए’ सॅम्पल तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.