केवळ सात हजारांवर शेतक-यांच्या कर्जाचे पुनर्गठन
By Admin | Updated: June 6, 2016 02:39 IST2016-06-06T02:39:29+5:302016-06-06T02:39:29+5:30
अकोला जिल्ह्यात आतापर्यंत ६८४ लाभार्थींंची निवड

केवळ सात हजारांवर शेतक-यांच्या कर्जाचे पुनर्गठन
संतोष येलकर/अकोला
खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर आल्या; मात्र ४ जूनपर्यंंत जिल्हय़ात केवळ ७ हजार ३७५ (५.३२ टक्के) शेतकर्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले असून, ५५ हजार शेतकर्यांना ३७८ कोटी ७१ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हय़ातील १ लाख ३१ हजार २३२ शेतकर्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन बँकांमार्फत केव्हा करण्यात येणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी, पीक कर्जाचे पुनर्गठन करून, शेतकर्यांना पुन्हा नवीन पीक कर्ज वाटप करण्याचा निर्णय शासनामार्फत गत महिन्यात घेण्यात आला. त्यानुसार जिल्हय़ातील १ लाख ३८ हजार ६0७ शेतकर्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचे काम राष्ट्रीयीकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, खासगी बँका आणि ग्रामीण बँकेच्या शाखांमार्फत सुरू करण्यात आले; परंतु ४ जूनपर्यंंत जिल्हय़ात केवळ ७ हजार ३७५ शेतकर्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले. एकूण कर्जदार शेतकर्यांच्या तुलनेत केवळ ५.३२ टक्के शेतकर्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले आहे. तसेच जिल्हय़ात यावर्षीच्या खरीप हंगामात १ लाख ३८ हजार ६0७ पेक्षा जास्त शेतकर्यांना ९७८ कोटी २१ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असले तरी, ४ जूनपर्यंंत ५५ हजार २९ शेतकर्यांना ३७८ कोटी ७१ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर आल्या असल्या तरी, जिल्हय़ातील पीक कर्जाचे पुनर्गठन आणि पीक कर्ज वाटपाचे अत्यल्प प्रमाण बघता, जिल्हय़ातील उर्वरित कर्जदार शेतकर्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन आणि पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट केव्हा पूर्ण होणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.