महिलेच्या बँक खात्यातून परस्पर १0 हजार काढले
By Admin | Updated: November 21, 2014 02:07 IST2014-11-21T02:07:27+5:302014-11-21T02:07:27+5:30
अधिकारी असल्याचे सांगुन ठगविले

महिलेच्या बँक खात्यातून परस्पर १0 हजार काढले
पातूर : भारतीय स्टेट बँकेच्या पातूर शाखेत खाते असलेल्या एका महिलेची अज्ञात इसमाने दूरध्वनीवरून खाते क्रमांक विचारून परस्पर १0५0२ रुपये काढून फसवणूक केल्याची तक्रार स्थानिक पोलिसांत शुक्रवारी दाखल करण्यात आली.
अकोला येथील जठापेठ भागात राहणार्या पार्वती झटाले यांचे पातूर येथील स्टेट बँकेत खाते आहे. शुक्रवार, २0 नोव्हेंबर रोजी एका अज्ञात व्यक्तीने भ्रमणध्वनीवरून त्यांच्याशी संपर्क साधला व बँकेतून बोलत असल्याचे सांगून तुमचा खाते क्रमांक तसेच कोड नंबर बदलावयाचा असल्याचे सांगितले. त्यानूसार झटाले यांनी भ्रमणध्वनीवरून आपला खाते क्रमांक सांगितला. त्यानंतर झटाले यांच्या खात्यातून परस्पर १0५0२ रुपयांची ऑनलाइन खरेदी करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
याबाबत झटाले यांनी बँकेशी संपर्क साधला असता, बँकेने त्यांना पोलिसांत फिर्याद देण्यास सांगितले. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ४१९ नुसार गुन्हा दाखल
केला.