अंत्री देशमुख : मेहकर ते अंत्री देशमुख या मार्गाची अत्यंत दुरावस्था झाली असून, या मार्गावर काही ठिकाणी डांबर उखडून खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहे. मेहकर ते अंत्री देशमुख हा रस्ता ६ किमी अंतराचा असून, या रस्त्यावर जागोजागी मोठ-मोठी खड्डे पडलेली आहेत. या रस्त्याने असलेल्या नाल्यावर पूल बांधलेले नसल्याने पावसाळ्यात व इतरवेळी वाहनधारकांना वाहने चालविताना कसरत करावी लागते. येथून कोठेही बाहेरगावी जायचे असल्यास मेहकर येथूनच जावे लागते. मेहकर ते अंत्री देशमुख दरम्यान ४ ते ५ कि.मी. अंतराच्या रस्त्यावरील डांबर उखडून मोठमोठे खड्डे पडल्याने दगड, गिट्टी उघडी पडली आहे. या रस्त्याच्या समस्येकडे लक्ष द्यावे व खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी आहे. (वार्ताहर) |