बंजारा समाजाबाबत धार्मिक, सामाजिक प्राचार्य पवारांची बांधिलकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:23 IST2021-08-21T04:23:43+5:302021-08-21T04:23:43+5:30

संत सेवालाल महाराज व माता जगदंबा यांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा आ. हरीश पिंपळे, ॲड. निलय नाईक, प्रा. डॉ. मधुकर ...

Religious, social principal Pawar's commitment to Banjara community! | बंजारा समाजाबाबत धार्मिक, सामाजिक प्राचार्य पवारांची बांधिलकी!

बंजारा समाजाबाबत धार्मिक, सामाजिक प्राचार्य पवारांची बांधिलकी!

संत सेवालाल महाराज व माता जगदंबा यांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा आ. हरीश पिंपळे, ॲड. निलय नाईक, प्रा. डॉ. मधुकर पवार, निरंजन महाराज, जितेंद्र महाराज पोहरादेवी, हिरासिंग राठोड, हर्षमाला मधुकर पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या साक्षीने दि. १९ ऑगस्ट रोजी जनुना गावात उत्साहाने झाला.

कार्यक्रमाची सुरुवात संत सेवालाल महाराज यांच्या स्तोत्र पठण तसेच प्रतिमेच्या पूजनाने झाली. महिलांनीही परंपरागत पोशाख परिधान करून संत सेवालाल महाराज यांच्या ओव्या सादर केल्या. संत सेवालाल महाराज व माता जगदंबा यांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. प्राचार्य मधुकरराव पवार यांनी ‘मी जे बोलतो ते करून दाखवतो, जनुना गावांत शिक्षणाची व्यवस्था नव्हती. जनुना नावानेच संस्था स्थापन करून विविध विषयांचे यूजी ते पीजीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी बांधवांना दालन खुले केले आहे’, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डी. एस. राठोड तर आभार संतोष राठोड यांनी मानले. कार्यक्रमाला गुलाम नबी आजाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संतोष हुशे, प्रा. डॉ. आर. आर. राठोड, प्रा.अजीत पाटील, प्रा. डॉ. संजय देशमुख, डॉ. सिद्धार्थ वाघमारे, प्रा. डॉ. शरद ईढोळे, प्रा. सुधीर राऊत, प्रा. डॉ. प्रवीण राठोड, प्रा.आदित्य पवार, सुभाष जाधव, सुरेश राठोड, एस. जी. राठोड, शांताराम जाधव, सतीश कापसे, डी. बी. जाधव, पंजाब जाधव, किसन पवार, प्रल्हाद पवार, मोहन पवार,

उपाध्यक्ष

हिरासिंग जाधव, सचिव रामेश्वर राठोड, सहसचिव बळीराम राठोड, सहसचिव कोषाध्यक्ष प्रा. आदित्य पवार, रायसिंग राठोड, सदस्य विजय बळीराम पवार, सदस्य अर्पणा गजानन राऊत, सदस्या अनिता रमेश पवार, सदस्या तथा सेवा पवार, सरपंच, जनुना वडाळा रमेश प्रभु राठोड, उपसरपंच सदस्य बीमसवाई राठोड, अनसूया दशरथ पवार, ज्योतीराम कनीराम पवार, रोशनी विश्वजित राठोड, कौशल्या सुखदेव चव्हाण, अरुणा जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: Religious, social principal Pawar's commitment to Banjara community!