शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

धार्मिक स्थळांचा अहवाल तयारच नाही; महापौरांच्या निर्देशांना क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:10 PM

अकोला : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मनपाने शहरात २००९ नंतर उभारलेल्या धार्मिक स्थळांना हटविण्याची कारवाई केली. तसा अहवाल राज्य शासनाकडे सादर केला.

ठळक मुद्दे शासकीय जागांवरील धार्मिक स्थळांचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले होते. महापौरांच्या निर्देशाला केराची टोपली दाखवल्याचे समोर आले आहे. या निर्देशाला झोन अधिकाऱ्यांनी ठेंगा दाखवत अद्यापही धार्मिक स्थळांचा अहवाल तयार केला नसल्याची माहिती आहे.

अकोला : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मनपाने शहरात २००९ नंतर उभारलेल्या धार्मिक स्थळांना हटविण्याची कारवाई केली. तसा अहवाल राज्य शासनाकडे सादर केला. यानंतर मुख्य रस्त्यालगतच्या २२२ धार्मिक स्थळांना हटविण्याच्या हालचाली मध्यंतरी प्रशासनाने सुरू करताच सत्ताधारी भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली होती. भविष्यात धार्मिक स्थळांवरील कारवाईला पूर्णविराम मिळावा, या उद्देशातून महापौर विजय अग्रवाल यांनी खुल्या तसेच शासकीय जागांवरील धार्मिक स्थळांचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले होते. पंधरा दिवसांचा कालावधी उलटून गेल्यावरही झोन अधिकाºयांनी अहवाल तयार केला नसून, महापौरांच्या निर्देशाला केराची टोपली दाखवल्याचे समोर आले आहे.शहरामध्ये २००९ नंतर उभारलेल्या धार्मिक स्थळांना हटविण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य शासनाला स्पष्ट आदेश होते. मनपा प्रशासनाने केलेल्या कारवाईचा अहवाल वेळोवेळी न्यायालयात सादर करण्याचे निर्देश होते. महापालिका प्रशासनाने पहिल्या टप्प्यात २००९ नंतरच्या ४८ धार्मिक स्थळांना हटविण्याची कारवाई केली. तसा अहवाल राज्य शासनाकडे जुलै महिन्यात सादर करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात २००९ पूर्वी उभारलेल्या ७३८ धार्मिक स्थळांनासुद्धा हटविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुषंगाने प्रशासनाने तयारी सुरू केल्याची माहिती आहे. धार्मिक स्थळांचा विषय नागरिकांच्या भावनेशी जुळलेला आहे. प्रभागांमधील खुल्या जागा, शासकीय जागांवर उभारलेल्या धार्मिक स्थळांमुळे नागरिकांमध्ये सामाजिक एकोपा नांदत असल्याचे बोलल्या जाते. अशा स्थळांचा वाहतुकीला अडथळा होत नसेल किंवा प्रभागातील नागरिकांमध्ये आपसात मतभेद नसतील, तर संबंधित धार्मिक स्थळांना नियमानुकूल करण्यासाठी अकोलेकरांचा सत्ताधारी भाजपावर दबाव वाढत चालला आहे. ही बाब लक्षात घेता महापौर विजय अग्रवाल यांनी शासकीय व खुल्या जागांवरील धार्मिक स्थळांचा इत्थंभूत अहवाल सादर करण्याचे निर्देश नगररचना विभागासह क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले होते. या निर्देशाला झोन अधिकाऱ्यांनी ठेंगा दाखवत अद्यापही धार्मिक स्थळांचा अहवाल तयार केला नसल्याची माहिती आहे.अकोलेकरांमध्ये भाजपाप्रती रोषधार्मिक स्थळांवर होणाऱ्या कारवाईमुळे अकोलेकरांमध्ये सत्ताधारी भाजपा व प्रशासनाप्रती प्रचंड असंतोष धुमसत आहे. भाजपाच्या कालावधीत अशा कारवाया होत असल्याने त्याचा फटका भाजपाला आगामी निवडणुकांमध्ये बसण्याची दाट शक्यता असल्याचे सर्वत्र बोलल्या जात आहे.

राज्यात अकोला मनपा अव्वलधार्मिक स्थळांवर कारवाई करून, त्याचा अहवाल शासनाकडे सादर करावा लागतो. त्यानंतर शासन न्यायालयाकडे माहिती सादर करते. राज्यातून सर्वाधिक धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई अकोला शहरात करण्यात आल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका