धार्मिक अल्पसंख्यक शिष्यवृत्तीसाठी अर्जांची गर्दी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 10:48 AM2019-11-27T10:48:19+5:302019-11-27T10:48:34+5:30

राज्यभरात ६ लाख ३८ हजार २६५ पात्र नूतनीकरण विद्यार्थ्यांपैकी ५ लाख ४६ हजार २१0 विद्यार्थ्यांनी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर अर्ज भरले आहेत.

Religious minority scholarship applications crowd! | धार्मिक अल्पसंख्यक शिष्यवृत्तीसाठी अर्जांची गर्दी!

धार्मिक अल्पसंख्यक शिष्यवृत्तीसाठी अर्जांची गर्दी!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : धार्मिक अल्पसंख्यक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. जिल्हास्तरावर आॅनलाइन अर्ज पडताळणीची अंतिम मुदत ३0 नोव्हेंबरपर्यंत असून, आतापर्यंत राज्यभरात ६ लाख ३८ हजार २६५ पात्र नूतनीकरण विद्यार्थ्यांपैकी ५ लाख ४६ हजार २१0 विद्यार्थ्यांनी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर अर्ज भरले आहेत. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यातील अल्पसंख्यक विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो. यासाठी शाळांनी नोंदणी करून संस्थास्तरावर विद्यार्थ्यांची पडताळणी केली. ज्या शाळांनी शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन अर्ज भरले नाहीत, त्यांनी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर शाळा नोंदणी करावी. गतवर्षीच्या तुलनेत मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचे नवीन नूतनीकरण विद्यार्थ्यांचे आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्यक गरजू व पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी शाळांनी घ्यावी. राज्यभरातून नवीन विद्यार्थी म्हणून ४ लाख ८२ हजार ७२९ अर्ज केले आणि नूतनीकरण विद्यार्थी म्हणून ६ लाख ३८ हजार २६५ पात्र नूतनीकरण विद्यार्थ्यांपैकी फक्त एकूण ५ लाख ४६ हजार २१0 अर्ज नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर अर्ज भरले आहेत. तसेच शाळास्तरावर नवीनचे १ लाख १९ हजार ५५ अर्ज तर नूतनीकरणाचे ८४ हजार ७७७ अर्ज पडताळणीसाठी प्रलंबित आहेत. जिल्हास्तरावर नवीनचे १ लाख ८0 हजार ९३0 तर नूतनीकरणाचे १ लाख ७७ हजार १७३ अर्ज पडताळणीसाठी प्रलंबित आहेत. या प्रलंबित अर्जांची तातडीने पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Religious minority scholarship applications crowd!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.