शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

‘टेरा इंडिया’ ई- वार्तापत्राचे कुलगुरु भाले यांच्या हस्ते विमोचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 2:16 PM

अकोला : निसर्ग शिक्षण देणाऱ्या ई.एफ. ई. सी. या संस्थेतर्फे टेरा इंडिया या ई-वार्तापत्राचे विमोचन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे कुलगुरु डॉ. विलास भाले यांच्या हस्ते बुधवार, २० जून रोजी करण्यात आले.

ठळक मुद्देहे वार्तापत्र लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरणाच्या संवर्धनाचे महत्व विषद करेल, असे कुलगुरु भाले म्हणाले.प्रकाशन सोहळ्याला शास्त्रज्ञ, निसर्गप्रेमी, रोटरी क्लब, विदर्भ एरोमॉडेलिंग आणि कृषी मित्र परिवार आदी संस्थांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. ई.एफ.ई.सी. या संस्थेचे सभासदत्व लहानांपासून मोठ्यापर्यंत कुणालाही मिळविता येईल, अशी घोषणा यावेळी उदय वझे यांनी केली.

अकोला : निसर्ग शिक्षण देणाऱ्या ई.एफ. ई. सी. या संस्थेतर्फे टेरा इंडिया या ई-वार्तापत्राचे विमोचन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे कुलगुरु डॉ. विलास भाले यांच्या हस्ते बुधवार, २० जून रोजी करण्यात आले.या कार्यक्रमात विविध विषयावंर चर्चा झाली. या प्रसंगी डॉ. भाले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दर महिन्याला प्रकाशीत होणारे हे वार्तापत्र एक उत्कृष्ट शैक्षणिक संदर्भ ग्रंथ असल्याचे सांगत हे वार्तापत्र लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरणाच्या संवर्धनाचे महत्व विषद करेल, असे कुलगुरु भाले म्हणाले.या प्रकाशन सोहळ्याला शास्त्रज्ञ, निसर्गप्रेमी, रोटरी क्लब, विदर्भ एरोमॉडेलिंग आणि कृषी मित्र परिवार आदी संस्थांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. ई.एफ.ई.सी. या संस्थेचे सभासदत्व लहानांपासून मोठ्यापर्यंत कुणालाही मिळविता येईल, अशी घोषणा यावेळी उदय वझे यांनी केली. संचालन रोटरी क्लबचे अध्यक्ष संदीप दोषी यांनी, तर आभार प्रदर्शन गिरीश नानोटी यांनी केले. आयोजनासाठी नेहरु तारापोरवाला आणि देवेंद्र तेलकर यांचे मार्गदर्शन लाभले.काय आहे ई.एफ.ई.सी.विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत सर्वांना हसत खेळत निसर्ग शिक्षण प्रदान करण्याच्या उद्देशाने ई.एफ.ई.सी. संस्थेची स्थापना झाली आहे. पुस्तकी शिक्षणाबरोबरच खुल्या आसमंतात निसर्ग अनुभवत घेतलेले शिक्षण तेवढेच महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांना दिल्या जाणारे निसर्ग शिक्षण अधिक मनोरंजनात्मक करण्यासाठी ई.एफ.ई.सी. कटीबद्ध आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ