गुलाबराव गावंडेंची स्थानबद्धतेनंतर मुक्तता
By Admin | Updated: October 18, 2014 23:24 IST2014-10-18T23:24:02+5:302014-10-18T23:24:02+5:30
एकीकडे अटकपूर्व जामीन, तर दुसरीकडे पोलिसांनी केले स्थानबद्ध.

गुलाबराव गावंडेंची स्थानबद्धतेनंतर मुक्तता
अकोला: राज्याचे माजी राज्यमंत्री व अकोला पश्चिम मतदारसंघातील शिवसेना उमेदवार गुलाबराव गावंडे यांच्याविरुद्ध बुधवारी दाखल झालेल्या गुन्हय़ाप्रकरणी, त्यांना शनिवारी दु पारी बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे स्थानबद्ध करण्यात आले होते; मात्र त्याच दरम्यान अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने, त्यांची मुक्तता करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी कौलखेडमधील एका मतदान केंद्रावर साहाय्यक पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी एका इसमास ताब्यात घेतले असता, गुलाबराव गावंडे व त्यांचे सुपुत्र युवराज गावंडे यांनी पोलिसांची अडवणूक केली, अशा आशयाची तक्रार, मुंढे यांच्या वाहनचालकाने बुधवारी रात्री येथील खदान पोलिस ठाण्यात नोंदविली होती. त्यावरून खदान पोलिसांनी गावंडे पिता-पुत्राविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३४१, २२५, ३५३, ५0४, ५0६ व १८६ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
गावंडे यांच्या वतीने अटकपूर्व जामिनासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जावर शनिवारी दुपारी मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. देशपांडे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली असता, न्यायालयाने गुलाबराव गावंडे व युवराज गावंडे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच, दुपारी २.३0 वाजताच्या सुमारास, बुलडाणा जिल्ह्या तील साखरखेर्डा पोलिसांनी गुलाबराव गावंडे यांना हिवरा आश्रम येथे ताब्यात घेतले व स् थानबद्ध केले. त्यानंतर खदान पोलिसांनी या कारवाईची माहिती न्यायालयास दिली आणि अटकपूर्व जामीन नाकारण्याची विनंती केली; मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावत, अटक पूर्व जामीन मंजूर करण्याचा निर्णय कायम ठेवला. त्यानुसार नंतर गावंडे यांना मुक्त करण्यात आले.