लाचखोर मंडळ अधिकारी व तलाठय़ाचा जामीन फेटाळला

By Admin | Updated: June 14, 2014 23:29 IST2014-06-14T22:34:36+5:302014-06-14T23:29:44+5:30

वाडेगावचा मंडळ अधिकारी व तलाठय़ाचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.

Rejecting the bribe of the bureaucrat officer and the police | लाचखोर मंडळ अधिकारी व तलाठय़ाचा जामीन फेटाळला

लाचखोर मंडळ अधिकारी व तलाठय़ाचा जामीन फेटाळला

अकोला: तक्रारदाराच्या पत्नीच्या नावाची सातबारामध्ये नोंद न करण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच कोतवालाच्या माध्यमातून स्वीकारणार्‍या वाडेगावचा मंडळ अधिकारी व तलाठय़ाचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला. त्यामुळे आता दोघाही लाचखोरांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली आहे. माझोड येथील एका तक्रारदाराला त्याच्या पत्नीच्या नावाची शेतीच्या सातबारामध्ये नोंद न करण्यासाठी वाडेगावचा मंडळ अधिकारी संतोष कर्णेवार व तलाठी अमित सबनिस यांनी ३५ हजार रुपयांची लाच कोतवाल गिरधर घोगरे व विजय काळे यांच्या माध्यमातून स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी माझोड येथे सापळा लावून घोगरे व काळेला रंगेहात पकडून अटक केली. संतोष कर्णेवार, अमित सबनिस हे फरार झाले. कर्णेवार व सबनिस यांनी जामीन मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला. ११ जून रोजी जिल्हा न्यायालयात अर्जावर सुनावणी झाली होती. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.

Web Title: Rejecting the bribe of the bureaucrat officer and the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.