शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर कर्जमाफीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 12:33 IST

कार्ली (वाशिम) : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जाची नियमित परतफेड करणाºया कार्ली परिसरातील जवळपास १५० ते २०० शेतकºयांना अद्याप प्रोत्साहनपर कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्ककार्ली (वाशिम) : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जाची नियमित परतफेड करणाºया कार्ली परिसरातील जवळपास १५० ते २०० शेतकºयांना अद्याप प्रोत्साहनपर कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. दीर्घ प्रतिक्षेनंतर प्रोत्साहनपर रक्कम मिळत नसल्याने शेतकºयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.मे व जून २०१७ या महिन्यात पीक कर्जमाफीसाठी विविध टप्प्यात आंदोलने झाल्याने राज्य सरकारने  जून महिन्यात कर्जमाफीची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१७ अखेर थकबाकीदार शेतकºयांना १ लाख ५० हजार पर्यंत कर्जमाफी व १ लाख ५० हजार वरील शेतकºयांना वनटाईम सेंटलमेंट योजना लागू केली तसेच २०१५-१६- २०१६-१७ या वर्षात ज्या शेतकºयांनी कर्जाची नियमितपणे परतफेड केली अशा श्ोतकºयांना २५ टक्के किंवा २५ हजार पर्यंत प्रोत्साहन लाभ देण्याचे घोषीत केले. कार्ली परिसरातील ४०० पेक्षा अधिक शेतकरी या प्रोत्साहन लाभासाठी पात्र आहेत. नियमित कर्जफेड करणाºया सर्वच शेतकºयांना आतापर्यंत प्रोत्साहनपर रक्कम मिळणे अपेक्षीत होते. सर्व प्रशासकीय सोपस्कार पूर्ण केल्यानंतरही केवळ प्रशासकीय दिरंगाईमुळे प्रोत्साहनपर रक्कम मिळत नसल्याने शेतकºयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. कार्ली परिसरातील किनखेडा, तोरनाळा, काटा, सोयता, भोयता, सावंगा जहॉगीर, सुराळा आदी गावातील जवळपास १५० ते २०० शेतकºयांना प्रोत्साहनपर कर्जमाफीची प्रतिक्षा आहे. कर्जमाफीची घोषणा होऊन दोन वर्षाचा कालावधी उलटला असतानाही प्रोत्साहनपर रक्कम न मिळाल्याने संबंधित बँकांबरोबरच संबंधित यंत्रणेची दप्तरदिरंगाई चव्हाट्यावर येत आहे. कर्जाचा नियमित भरणा करणाºया शेतकºयांची बाब शासन व प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचा आरोपही कार्ली परिसरातील शेतकºयांनी केला. जिल्हा उपनिबंधक कार्यालय तसेच जिल्हा अग्रणी बँकेने याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकºयांनी शुक्रवारी केली.

आम्ही पीककर्जाची नियमित परतफेड करतो. प्रोत्साहनपर कर्जमाफीसाठी पात्र ठरलो. मात्र, अद्याप आम्हाला या योजनेचा लाभ मिळाला नाही.- व्दारकाबाई घमराव देशमुखकार्ली ता. जि. वाशिम नियमित कर्जफेड करीत असल्याने प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलो. परंतू, अजूनही प्रोत्साहनपर रक्कम मिळाली नाही. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देणे अपेक्षीत आहे.- मनोहर महाजी वानखेडेकार्ली, ता. जि. वाशिम

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी