अकोला : अत्यंत कमी पाण्यावर हमखास उत्पन्न देणारी शेती म्हणून रेशीम शेतीकडे पाहिले जाते. जिल्ह्यात यंदा रेशीम कोष उत्पादनासाठी ५५० एकरात नोंदणी करण्यात आली आहे. दरवर्षी क्षेत्रात वाढ होत आहे.
--------------------------------------------------
शेतमालाचे नुकसान
अकोला : भाजीबाजार बंद असल्याने भाजीपाल्याचा माल शेतकऱ्यांना शेतातच फेकून द्यावा लागत आहे. कडक निर्बंधांमुळे ठिकाणचा व्यवहार बंद आहे. शेतमालाला खरेदीदार मिळत नाही.
--------------------------------------------------
शेतकरी हैराण
अकोला : जंगलाला लागून शेती असलेले शेतकरी कमालीचे हैराण झाले आहेत. त्यांच्या शेतातील पिकांची वन्यप्राणी नासाडी करीत आहे. रानडुक्कर, रोही यासारखी जनावरे शेतातील पिके उद्ध्वस्त करीत आहे, शिवाय जनावरांपासून जीवितास धोका आहे.
-----------------------------------------------------
शासनाने कलावंतांना आर्थिक मदत देण्याची मागणी
अकोला : जिल्ह्यातील नाटक, तमाशा, गोंधळ, भारुड यासारख्या इतर कलेच्या कलावंतांना एक विशेष बाब म्हणून आर्थिक मदत करणारा लोक कल्याणकारी धोरणात्मक निर्णय घेऊन दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
-----------------------------------------------------
फुलशेतीचे हजारो रुपयांचे नुकसान
अकोला : जिल्ह्यातील शेतकऱ्याने त्यांच्या शेतामध्ये विविध जातीचे फुले, झेंडू, नवरंग, बिजली आदी पेरली आहेत व ती फुलशेती बहरून आलेली असताना, त्या फुलांना फुलशेती बाजारपेठ बंद असल्याकारणाने नुकसानीचा सामना करावा लागत आहे. फुलांना विक्री नाही.
-----------------------------------------------------