तूर खरेदीसाठी नोंदणी सुरूच झाली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 14:51 IST2019-02-13T14:50:52+5:302019-02-13T14:51:02+5:30

अकोला : शासनाने हमीभावानुसार तूर खरेदीसाठी प्रत्येक तालुक्यात खरेदी केंद्र सुरू करण्याची तयारी केली. त्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणीसाठी २३ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली; मात्र तेल्हारा खरेदी-विक्री संघात नोंदणी प्रक्रिया सुरूच न झाल्याने शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे.

 Registration for purchase of tur was not started | तूर खरेदीसाठी नोंदणी सुरूच झाली नाही

तूर खरेदीसाठी नोंदणी सुरूच झाली नाही

अकोला : शासनाने हमीभावानुसार तूर खरेदीसाठी प्रत्येक तालुक्यात खरेदी केंद्र सुरू करण्याची तयारी केली. त्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणीसाठी २३ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली; मात्र तेल्हारा खरेदी-विक्री संघात नोंदणी प्रक्रिया सुरूच न झाल्याने शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने नोंदणी प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी तेल्हारा खविसंचे संचालक, जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट यांनी जिल्हा उपनिबंधकांना निवेदनातून केली आहे.
प्रत्येक तालुका स्तरावर तूर, हरभरा खरेदी करण्याचे धोरण शासनाने जाहीर केले आहे. त्यासाठी शेतकºयांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. तेल्हारा तालुक्यातील शेतकºयांना तेल्हारा खरेदी-विक्री संस्थेत नोंदणी करण्याची सोय करण्यात आली; मात्र त्या ठिकाणी नोंदणीची सुविधाच उपलब्ध झालेली नाही. दरम्यान, नोंदणीसाठी शासनाने ठरवून दिलेली मुदत २३ फेब्रुवारी जवळ येत आहे. तरीही नोंदणी सुरू झालेली नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकºयांची गैरसोय होत आहे. तेल्हारा खरेदी-विक्री संस्थेत तातडीने नोंदणी सुरू करावी, तसे न झाल्यास शेतकºयांवर अन्याय होणार आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही अरबट यांनी निवेदनात केली आहे.

 

Web Title:  Registration for purchase of tur was not started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.