विभागीय स्तर राजीव गांधी खेळ अभियान कुस्ती स्पर्धा
By Admin | Updated: October 17, 2014 23:32 IST2014-10-17T23:32:09+5:302014-10-17T23:32:09+5:30
अकोला येथील स्पर्धेत अमरावती विभागातील १६ वर्षाआतील विद्यार्थ्यांचा सहभाग.

विभागीय स्तर राजीव गांधी खेळ अभियान कुस्ती स्पर्धा
अकोला: क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत राजीव गांधी खेळ अभियान (ग्रामीण) अंतर्गत कुस्ती क्रीडा स्पर्धा शुक्रवार १७ ऑक्टोबर रोजी घेण्यात आली.
संत गाडगेबाबा व्यायामशाळा जुने शहर येथे झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कुस्ती संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ गोतमारे उपस्थित होते. स्पर्धेत अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ व बुलडाणा जिलतील १६ वर्षाआतील मुले-मुली सहभागी झाले होते. पंचाधिकारी म्हणून महेंद्र मलिये, कुणाल टोबरे, निखिल वाकोडे यांनी काम पाहिले. राज्य क्रीडा मार्गदर्शक दत्तात्रय माने स्पर्धा संयोजक होते.
स्पर्धेचा अंतिम निकाल
विजेते-उपविजेते अनुक्रमे: मुले: ४२ किलो वजनगट- अमोल डामरे (अकोला), सुदर्शन हराळ (वाशिम), ४६ किलो- आदिनाथ भोयर (वाशिम), ऋषिकेश चाळगे (बुलडाणा), ५0 किलो- सुमेध इंगळे (अकोला), गजानन राठोड (वाशिम), ५४ किलो- कार्तिक नागे (अकोला), रवी राठोड (वाशिम), ५८ किलो- मयूर आडेकर (बुलडाणा), अमोल बोरकर (अकोला), ६३ किलो- मच्छिंद्र भोयर (वाशिम), योगेश वाघ (बुलडाणा), ६९ किलो- शुभम गादेकर (वाशिम), ऋषिकेश पायघन (बुलडाणा), ७६ किलो- ज्ञानेश्वर बर्गे.
मुलींमध्ये ३८ किलो- भाग्यश्री धोटकर (अमरावती), नंदा डवरे (बुलडाणा), ४0 किलो- महिमा राठोड (यवतमाळ), मेनका चव्हाण (बुलडाणा), ४३ किलो- गायत्री आष्टेकर (अमरावती), अंकिता राठोड (अकोला), ४६ किलो- पूजा येवले (अमरावती), पूजा भराड (बुलडाणा), ४९ किलो- अंजली धनवटे (बुलडाणा), संप्रदा खाडे (अमरावती), ५६ किलो- रूचा उगले (बुलडाणा), ६0 किलो- शुभांगी सुरडकर (बुलडाणा), ६५ किलो- वैष्णवी शिंदे (बुलडाणा), ६५ किलोच्या वर अमृता जाधव बुलडाणा.