शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाकडून मिहीर कोटेचांच्या कार्यालयाची तोडफोड; मुंबईत जोरदार राडा
2
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
3
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
4
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
5
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
6
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
7
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
8
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
9
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
10
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
11
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
12
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
13
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
14
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
15
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
16
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
17
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
18
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
19
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
20
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान

प्रादेशिक विकास मंडळे बरखास्त होण्याच्या मार्गावर; ३० एप्रिल रोजी संपणार मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 10:17 AM

मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मंडळांना मुदतवाढ देण्याबाबत कुठलाही निर्णय झाला नसल्याने ही मंडळे बरखास्त होण्याच्या मार्गावर आहेत.

- राजेश शेगोकार

अकोला : राज्यात प्रादेशिक समतोल विकास साधण्यासाठी विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र या क्षेत्रांसाठी प्रादेशिक विकास मंडळे निर्माण करण्यात आले होते. या मंडळांची मुदतवाढ ३० एप्रिल रोजी संपत असून सोमवार, २७ एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मंडळांना मुदतवाढ देण्याबाबत कुठलाही निर्णय झाला नसल्याने ही मंडळे बरखास्त होण्याच्या मार्गावर आहेत.विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र या तिन्ही विभागाच्या विकासाचा अनुशेष दूर व्हावा, यासाठी तीन मंडळे निर्माण करण्यात आली होती. राज्यघटनेच्या कलम ३७१ (२) अन्वये राष्ट्रपतींनी ९ मार्च १९९४ रोजी तीन प्रादेशिक विकास मंडळे स्थापन करण्याबाबत आदेश निर्गमित केले. या आदेशान्वये राज्यपालांनी ३० एप्रिल १९९४ रोजी विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र या क्षेत्रांसाठी तीन वैधानिक मंडळांची स्थापना केली. २५ जून १९९४ रोजी मंडळाचे अध्यक्ष व सदस्यांच्या नेमणुका केल्या. या मंडळांचा कार्यकाळ ३० एप्रिल १९९९ ला संपणार होता; परंतु विकासाचा प्रादेशिक असमतोल पूर्णपणे दूर न झाल्याने राष्ट्रपतींनी मंडळाला ३० एप्रिल २०१० पर्यंत मुदतवाढ दिली. त्यानंतर ३० एप्रिल २०१० पासून दर पाच वर्षांनी या मंडळांना मुदतवाढ मिळाली. येत्या ३० एप्रिल रोजी या मंडळाची मुदतवाढ संपुष्टात येत आहे. या पृष्ठभूमिवर नागपूरचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी,महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मुदतवाढीची शिफारस माननीय राज्यपाल यांना करावी, अशी मागणी केली; परंतु २७ एप्रिल २०२० रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधी काही निर्णय न झाल्याचे समजते. त्यामुळे महाराष्ट्रात विकास मंडळे यांना मुदतवाढ मिळणार की नाही, याबद्दल शंका निर्माण झाली आहे.

मंडळेच रद्द करण्याचा तर डाव नाही ना?सुरुवातीच्या काळात विकास मंडळांना, सामूहिक विकास योजनेंतर्गत एकत्रित रुपये शंभर कोटी इतका विशेष निधी वाटप करण्याचे अधिकार होते; परंतु ५ सप्टेंबर २०११ नंतर हे अधिकार समाप्त करण्यात आले. त्यामुळे विकास मंडळाचे अध्यक्षपद घेण्यात राजकीय व्यक्तींना रस उरला नव्हता, तसेच मंडळांच्या तज्ज्ञ सदस्यांमध्ये एनजीओद्वारे सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश पण करण्यात आला, त्यामुळे या मंडळांचे अध्यक्षपद शोभेचेच ठरल्याचे समोर आले. तसेच विभागांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने अभ्यास करण्याचे काम खासगी संस्थांनाही देण्यात आले होते, त्यामुळे मंडळांचा मुख्य उद्देशच हरवित चालला होता. या मंडळांना मुदतवाढ न देता ही मंडळेच संपविण्याचाही डाव नाही ना? असाही संशय व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रातील विभागांचा विविध क्षेत्रांमधील झालेला असमतोल विकास मांडण्याचे एक प्रभावी व्यासपीठ म्हणून विकास मंडळाचे महत्त्व आहे; परंतु ३0 एप्रिलनंतर विकास मंडळांना मुदतवाढ न मिळाल्यास, हे व्यासपीठ, विशेष करून विदर्भ-मराठवाडा ' या अविकसित भागांना गमवावे लागेल.- डॉ. संजय खडक्कारमाजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर.

 

टॅग्स :AkolaअकोलाVidarbha Development Boardविदर्भ वैधानिक विकास मंडळGovernmentसरकार