निकालानंतर भरती आणि बदली! प्रशासन पुन्हा होणार व्यस्त
By Admin | Updated: May 12, 2014 19:57 IST2014-05-12T17:45:16+5:302014-05-12T19:57:15+5:30
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अकोला जिल्ात कर्मचार्यांची बदली आणि पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

निकालानंतर भरती आणि बदली! प्रशासन पुन्हा होणार व्यस्त
अकोला : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अकोला जिल्ात कर्मचार्यांची बदली आणि पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कामातून मुक्त झालेले प्रशासन पुन्हा व्यस्त होणार आहे.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी शुक्रवार, १६ मे रोजी होत आहे. मतमोजणी आटोपताच जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या सार्वत्रिक बदलीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार दरवर्षी १६ मेनंतर वर्ग ३ आणि ४ मधील कर्मचार्यांची बदली प्रक्रिया राबविली जाते. यावर्षी निवडणुकीचा निकालच १६ मे रोज असल्याने आता ही प्रक्रिया जिल्हा स्तरावर १७ ते २३ मेदरम्यान राबविली जाणार आहे. त्यानंतर २६ ते ३१ मेदरम्यान पंचायत समितीस्तरावर कर्मचार्यांची बदली प्रक्रिया पूर्ण केली जाईल. जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या बदली प्रक्रियेसोबतच जिल्ात पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. अकोला जिल्ात भरती प्रक्रिया २५ मेनंतर राबविली जाईल. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. २५ मेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावयाचे असून, २६ मे बँकेत पैसे भरण्याची शेवटची मुदत आहे.