नकारवाईच्या नावाखाली वसुली; बाळापूर तहसीलदारांकडून चौकशी
By Admin | Updated: January 3, 2015 00:43 IST2015-01-03T00:43:58+5:302015-01-03T00:43:58+5:30
‘लोकमत स्टिंग ऑपरेशन’ची दखल.
नकारवाईच्या नावाखाली वसुली; बाळापूर तहसीलदारांकडून चौकशी
अकोला: रेती चोरी करणार्या वाहनधारकांकडून कारवाईच्या नावाखाली महसूल कर्मचार्यांकडून हजारो रुपयांची वसुली करण्यात येत असल्याचे स्टिंग ऑपरेशन शुक्रवारी ह्यलोकमतह्णमध्ये प्रकाशित झाल्यानंतर महसूल प्रशासन खडबडून जागे झाले. लोकमत स्टिंग ऑपरेशनची दखल घेत, यासंदर्भात बाळापूरच्या तहसीलदारांनी चौकशी केली.
शेगाव आणि बाळापूर येथील तहसीलदारांनी रेती चोरट्यांविरोधात कारवाई सुरू केली असून, याच अधिकार्यांचे कर्मचारी खुलेआम रेती चोरी करणार्या वाहनधारकांकडून कारवाईच्या नावाखाली दररोज हजारो रुपयांची वसुली करीत असल्याची बाब ह्यलोकमतह्यने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आली. शेगाव शहराबाहेर बाळापूर येथील रेती चोरी करणार्यांविरुध्द कारवाई करणार्या पथकाकडून वाहने थांबवून, कारवाईच्या नावाखाली हजारो रुपयांची वसुली केली जाते. त्यामध्ये तीन वाहनांचे प्रत्येकी १५ हजार रुपयांप्रमाणे पथकातील दोन अधिकार्यांना पैसे देण्यात आले. हप्ते दिल्यानंतर रेती चोरी करणार्या वाहनांना सर्रास सोडून दिले जात असून, पैशासाठी जिल्ह्याची हद्द व इतर ठिकाणीही वसुली केली जात आहे. यासंदर्भात रेती तस्करांना महसूल कर्मचार्यांचे अभय या शीर्षकाखाली स्टिंग ऑपरेशन २ जानेवारी रोजी लोकमतमध्ये प्रकाशित झाले. या वृत्ताची दाखल घेत बाळापूरचे तहसीलदार समाधान सोळंके यांनी यांसदर्भात चौकशी केली. तसेच संबंधित माहितीची पडताळणी केली.
बाळापूर तहसील कार्यालयाच्या पथकाकडून ३१ डिसेंबर रोजी लोहारा येथील मन नदीतून रेती भरून शेगावकडे जाणारी दोन वाहने शेगाव रोडवर अडसूल फाट्याजवळ पकडली. तसेच पारसकडे जाणारे एक वाहन पकडण्यात आले. वाहनधारकांकडून वसूल करण्यात आलेल्या दंडाची रक्कम त्याच दिवशी चालानद्वारे बँकेत जमा करण्यात आली असल्याचे बाळापूरचे तहसीलदार समाधान सोळंके यांनी स्पष्ट केले.
*जिल्हाधिका-यांनी ह्यएसडीओंह्णना दिले चौकशीचे निर्देश!
रेती चोरी करणार्या वाहनधारकांकडून कारवाईच्या नावाखाली महसूल कर्मचार्यांच्या पथकाकडून वसुली करण्यात येत असल्याबाबत ह्यलोकमतह्णमध्ये प्रकाशित झालेल्या ह्यस्टिंग ऑपरेशनह्णच्या अनुषंगाने यासंदर्भात चौकशी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी बाळापूर उपविभागीय अधिकार्यांना (एसडीओ) शुक्रवारी दिले.