शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

अकोला परिमंडळात महावितरणची वसुली मोहीम जोरात

By atul.jaiswal | Published: November 11, 2017 3:51 PM

महावितरणच्या अकोला परिमंडळाअंतर्गत येत असलेल्या अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन्ही जिल्ह्यांमध्ये कृषीपंपधारक ग्राहक वगळता सर्वच प्रकारच्या वीज ग्राहकांकडून थकबाकी वसुलीची मोहिम जोरात सुरु करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपथके गठित वीज ग्राहकांचाही प्रतिसाद

अकोला : महावितरणची आर्थिक स्थिती बिकट असल्याने वीज ग्राहकांकडील थकबाकी वसूल करण्यावर महावितरणकडून भर दिल्या जात आहे. महावितरणच्या अकोला परिमंडळाअंतर्गत येत असलेल्या अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन्ही जिल्ह्यांमध्ये कृषीपंपधारक ग्राहक वगळता सर्वच प्रकारच्या वीज ग्राहकांकडून थकबाकी वसुलीची मोहिम जोरात सुरु करण्यात आली आहे. यासाठी विविध पथकांचे गठण करण्यात आले असून, पहिल्यांदाच ‘बॅक आॅफीस’ कर्मचाºयांनाही या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले आहे. थकीत देयक न भरणाºया वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे.महावितरणचा वीज ग्राहकांकडील थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. महावितरणच्या अकोला परिमंडळाअंतर्गत येत असलेल्या अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील सर्वच प्रकारातील ग्राहकांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. वाढत्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक घडी विस्कटल्याच्या पृष्ठभूमीवर महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी थकबाकी वसुलीवर भर देण्याचे आदेश परिमंडळांच्या मुख्य अभियंत्यांना दिले आहेत. यानुषंगाने अकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात थकबाकी वसुली करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. परिमंडळातील प्रत्येक उपविभागास वसुलीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. थकबाकीचा भरणा न करणाºया ग्राहकांविरुद्ध वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई करण्यात येत आहे. थकबाकीदारांनी थकीत देयक भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :mahavitaranमहावितरण