शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

‘पणन’ची यावर्षी विक्रमी कापूस खरेदीकडे वाटचाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 13:56 IST

पनण महासंघाचे ३४ केंद्रावर १ लाख ५० हजार क्विंटलवर कापूस खरेदी केला आहे.

ठळक मुद्देगत पाच दिवसात १ लाख ५० हजार क्विंटलवर कापूस खरेदी करण्यात आला आहे.आतापर्यंत ५० पैकी ३४ खरेदी केंद्रच सुरू करण्यात आले आहेत.मंगळवारपर्यंत ७ कोटी ४० लाख रुपयांचे चुकारे शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले होते.

- राजरत्न सिरसाट

अकोला : गत पाच वर्षात कापसाची नाममात्र खरेदी करणाऱ्या महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाची यावर्षी विक्रमी खरेदीकडे वाटचाल सुरू असून, गत पाच दिवसात १ लाख ५० हजार क्विंटलवर कापूस खरेदी करण्यात आला आहे. आधारभूत किमतीने शेतकऱ्यांना आतापर्यंत १५ कोटी रुपयांचे चुकारेही करण्यात आले आहेत. उर्वरित चुकारे शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत.आधारभूत किमतीपेक्षा दर जास्त व विक्री केलेल्या कापसाची रक्कम लगेच मिळत असल्याने शेतकºयांनी पणन महासंघाच्या खरेदी केंद्राकडे पाठ फिरविली होती. यावर्षी मात्र शेतकºयांनी पणन महासंघाला पसंती दिली असून, खरेदी केंद्रावर दररोज कापसाची आवक वाढत आहे. राज्यात आतापर्यंत ५० पैकी ३४ खरेदी केंद्रच सुरू करण्यात आले आहेत. याच ३४ केंद्रावर गत पाच दिवसात कपाशीचा ओघ वाढला आहे.गत तीन वर्षांची कापूस खरेदीची आकडेवारी बघितल्यास २०१६-१७ मध्ये पणन महासंघाला भोपळाही फोडता आला नाही. म्हणजेच एक क्विंटलही कापूस खरेदी केला नव्हता. २०१७-१८ मध्ये केवळ २,८५५ क्विंटल तर २०१८-१९ मध्ये ३५,७६३ क्विंटल कापूस पणल महासंघाने खरेदी केला होता. त्या तुलनेत या तीन वर्षात भारतीय कापूस (सीसीआय) महामंडळाने २०१६-१७ मध्ये २ लाख ३१ हजार क्विंटल, २०१७-१८ मध्ये ६८,३८३ तर २०१८-१९ ला ९ लाख ५३ हजार क्विंटल विक्रमी कापूस खरेदी केली. यावर्षी सीसीआयने ८१ खरेदी केंद्र सुरू केली असून, आतापर्यंत २ लाख ५५ हजार क्विंटल कापूस खरेदी केला. या तुलनेत पनण महासंघाचे ३४ केंद्रावर १ लाख ५० हजार क्विंटलवर कापूस खरेदी केला आहे.

 राज्यात ५० पैकी ३४ कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून, आजमितीस १ लाख ५० हजार क्विंटलवर कापूस खरेदी करण्यात आला आहे. ‘पणन’ला कापूस विक्री करणाºया शेतकºयांना ५५ कोटीच्यावर चुकारे अदा करण्याची प्रक्रिया सुरू असून, मंगळवारपर्यंत ७ कोटी ४० लाख रुपयांचे चुकारे शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले होते. गुरुवारपर्यंत ही रक्कम १५ कोटीपर्यंत गेली असून, उर्वरित चुकारे करण्याचे काम वेगाने सुरू आहे.- राजाभाऊ देशमुख,अध्यक्ष,पणन महासंघ.

 

टॅग्स :AkolaअकोलाcottonकापूसagricultureशेतीFarmerशेतकरी