शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

भुईमुग वाणाच्या संशोधनासाठी सामंजस्य करार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 10:28 AM

हा करार तीन वर्षांसाठी असून, या अंतर्गत भुईमुगाचा वाण ‘टीएजी-७३’ची विद्यापीठ स्तरावर शिफारस करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व भाभा अणुसंशोधन केंद्रांमध्ये झालेल्या बैठकीत बियाण्यांच्या उत्पादनासाठी सामंजस्य करार करण्यात आला. हा करार तीन वर्षांसाठी असून, या अंतर्गत भुईमुगाचा वाण ‘टीएजी-७३’ची विद्यापीठ स्तरावर शिफारस करण्यात आली. हे वाण मंजुरीसाठी महाराष्ट्र संशोधन परिषदेकडे पाठविण्यात आल्याची माहिती कृषी विद्यापीठातर्फे देण्यात आली.कृषी संशोधन सामंजस्य करारासंदर्भात २६ जून रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि भाभा अणुसंशोधन केंद्र यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत झालेल्या सामंजस्य करारानुसार दोन्ही संस्था एकत्रित येऊन बियाण्यांचे संशोधन करणार आहेत. यापूर्वी २०१९ मध्ये विदर्भातील शेतकऱ्यांसाठी मोहरीचा ‘टीएम-१०८-१’ हा वाण विकसित केला होता. त्यानंतर भुईमुगाच्या ‘टिएजी-७३’ या वाणाची शिफारस विद्यापीठ स्तरावर करण्यात आली असून, ते मंजुरीसाठी महाराष्ट्र संशोधन परिषदेकडे सादर केले आहे. पैदासकार बियाण्यांच्या उत्पादनासोबतच वेगवेगळ््या बीजोत्पादन संस्थांना बियाणे पुरवठा करण्यावरही भर दिला जाणार आहे. यापूर्वी प्रामुख्याने टीएजी-२४ (भुईमुग), टीएयु-१ (उडीद) व पीडीकेव्ही तारा (तूर) इत्यादी वाणांचा मोठा प्रसार झाला आहे. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांनी सामंजस्य करारांतर्गत अधिक उत्पादन, लवकर तयार होणाºया, पाण्याचा ताण सहन करणाºया, बदलत्या हवामानात टिकाव धरणाºया वाणांचा विकास करण्याबाबत मार्गदर्शन केले. या सामंजस्य करारासाठी संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी तसेच भाभा अणुसंशोधन केंद्राचे गट संचालक डॉ. एस.के. घोष व डॉ. पी. सुप्रन्ना यांनी मार्गदर्शन केले. या सामंजस्य करारासाठी डॉ. आर.बी. घोराडे, डॉ. ई.आर. वैद्य, डॉ. आर.एन. काटकर, डॉ. आर.डी. रत्नपारखी, सचिन शिंदे यांनी सहकार्य केले.

बदलत्या हवामानानुसार करणार संशोधनसामंजस्य करारांतर्गत विदर्भातील बदलते कृषी हवामान आणि भविष्यातील आवश्यकतेनुसार संशोधन केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने अधिक उत्पादन, लवकर तयार होणाºया, पाण्याचा ताण सहन करणाºया, बदलत्या हवामानात टिकाव धरणारे वाणांच्या विकासावर भर राहणार आहे.

हुरड्यासाठी ज्वारीचा नवे वाण प्रस्तावित!दोन वाणाच्या यशस्वी उत्पादनानंतर विद्यापीठाने ज्वारीचा ‘टीएकेपीएस-५’ हा वाण हुरड्यासाठी प्रस्तावित केला आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व भाभा अणुसंशोधन केंद्र यांच्यातील करारानुसार, या काळात हवामानातील बदलानुसार वाण विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.- प्रा. डॉ. ई.आर. वैद्य,कृषी वनस्पतीशास्त्र विभाग, पीडीकेव्ही, अकोला.

 

टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठAkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्र