श्री समर्थ पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलजला ‘फिट इंडिया’ची मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:47 IST2021-01-13T04:47:55+5:302021-01-13T04:47:55+5:30
विद्यार्थ्यांमधील क्रीडाकौशल्य विकसित व्हावे, ते शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असावेत यासाठी केंद्रीय खेळ व युवा मंत्रालयातर्फे ‘फिट इंडिया’ ही मोहीम देशभरात ...

श्री समर्थ पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलजला ‘फिट इंडिया’ची मान्यता
विद्यार्थ्यांमधील क्रीडाकौशल्य विकसित व्हावे, ते शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असावेत यासाठी केंद्रीय खेळ व युवा मंत्रालयातर्फे ‘फिट इंडिया’ ही मोहीम देशभरात राबविली जाते. याअंतर्गत अकोल्याच्या श्री समर्थ पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या तब्बल ५८८ विद्यार्थ्यांनी यात नोंदणी केली. या शाळेत नियमित अभ्यासाव्यतिरिक्त क्रीडा स्पर्धा, क्रीडा प्रदर्शन, विविध खेळांचे प्रात्यक्षिक, ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांची माहिती विद्यार्थ्यांना वेळोवेळी दिली जाते. शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख शिवाजी चव्हाण, सहकारी मयूर निंबाळकर, मनीषा खांडेजोड, राम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनात राबविलेल्या या क्रीडाविषयक उपक्रमांची दखल घेत शाळेला ‘फिट इंडिया’चा अधिकृत लोगो वापरण्याची परवानगी केंद्रीय खेळ व व युवा मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली आहे. याबद्दल शाळेचे संचालक प्रा. नितीन बाठे, राजेश बाठे, जयश्री बाठे, किशोर कोरपे, किशोर रत्नपारखी, योगेश जोशी, मुख्याध्यापक रविकांत शिंदे, विद्या आखरे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
0000000000000000
चौकटीतील मजकूर
‘फिट इंडिया’ या उपक्रमांतर्गत सहभागी विद्यार्थ्यांना भारत सरकारतर्फे ‘खेलो इंडिया’ उपक्रमांतर्गत आयोजित होणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धांत सहभागी होण्याची संधी मिळते. यासाठी विद्यार्थ्यांना पाच ऑनलाइन परीक्षा द्याव्या लागतात. वर्षातून दोन वेळा या परीक्षा होतात. यात यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘खेलो इंडिया’ उपक्रमातील विविध स्पर्धांत सहभागी होता येते.
फोटो -
8x10