घर खाली करून देण्याच्या कारणावरून महिलेस पेटविले

By Admin | Updated: June 6, 2015 01:42 IST2015-06-06T01:42:26+5:302015-06-06T01:42:26+5:30

कुरूम येथील घटना.

The reason for giving down the house is to lighten the women | घर खाली करून देण्याच्या कारणावरून महिलेस पेटविले

घर खाली करून देण्याच्या कारणावरून महिलेस पेटविले

कुरुम (जि. अकोला): घर खाली करण्याच्या मागणीस नकार देत असल्याच्या कारणावरून सहा जणांनी ५ जून रोजी सकाळी ११.३0 वाजताच्या सुमारास ६0 वर्षीय वृद्ध महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याची घटना येथे घडली. महिलेच्या फिर्यादीवरून माना पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कुरुम येथील जितू रेवतकर, नरेंद्र घाटोळ, जुगल राठी, संतोष कुरेवार, दयानंद गणोरकर, मीरा पवार या सहा जणांनी शुक्रवारी सकाळी ११.३0 वाजता येथील लक्ष्मी गोविंदराव धुर्वे या ६0 वर्षीय महिलेच्या घरी जाऊन तिला घर खाली करून देण्यास सांगितले; परंतु तिने घर सोडून जाण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनी रागाच्या भरात तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. त्यामुळे ती जळाली. तिला लोकांनी उपचारासाठी अमरावतीच्या इर्विन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिने दिलेल्या फिर्यादीवरून माना पोलिसांनी उपरोल्लेखित सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला.

Web Title: The reason for giving down the house is to lighten the women