तिसरी लाट रोखण्यासाठी तयार; जिल्ह्यात एक हजार खाटा वाढणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:18 IST2021-05-14T04:18:55+5:302021-05-14T04:18:55+5:30
कोठे किती खाटा वाढविण्याची तयारी पातूर - १०० बार्शिटाकळी - १०० बाळापूर - १०० अकोट - १०० तेल्हारा - ...

तिसरी लाट रोखण्यासाठी तयार; जिल्ह्यात एक हजार खाटा वाढणार!
कोठे किती खाटा वाढविण्याची तयारी
पातूर - १००
बार्शिटाकळी - १००
बाळापूर - १००
अकोट - १००
तेल्हारा - १००
सुपर स्पेशालिटी - २५०
मूर्तिजापूर काेविड रुग्णालय - ३०
प्रशासकीय यंत्रणा तयार
ऑक्सिजन
ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये म्हणून सर्वोपचार रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त जिल्ह्यात विविध ठिकाणी लिक्विड ऑक्सिजन टँक उभारण्यात येत आहेत.
ऑक्सिजन खाटा
जिल्ह्यात तालुकानिहाय प्रस्तावित कोविड रुग्णालयातील सर्वच ऑक्सिजनच्या खाटा असणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यात सुमारे एक हजार ऑक्सिजनच्या खाटा वाढणार आहेत.
सात कोविड केअर सेंटर
जिल्ह्यात सद्य:स्थितीत सात कोविड केअर सेंटर आहेत. या ठिकाणी सौम्य लक्षणे असलेल्या कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या ठिकाणी डॉक्टरांच्या निगराणीत रुग्ण उपचार घेत आहेत.
औषधं
कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यक रेमडेसिविरसह इतर प्रभावी औषधं जिल्ह्यात उपलब्ध असून, त्याचा तुटवडा भासणार नाही या दृष्टिकोनातून आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन नियोजन करत आहे.
प्रत्येक तालुक्यात १०० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीमसह सीपॅप यंत्रणाही कार्यान्वित असणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून, ती पूर्णत्वास आल्यानंतर रुग्णालय सुरू करण्यात येतील. रुग्णालयांसाठी जागा निश्चित करण्यात आली असून, रुग्णालयासाठी आवश्यक साहित्याची ऑर्डरही देण्यात आली आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला