राजस्थान विरुद्धच्या सामन्यात रवीची उत्तम गोलंदाजी

By Admin | Updated: November 7, 2014 23:15 IST2014-11-07T23:15:18+5:302014-11-07T23:15:54+5:30

सात षटकात तीन गडी बाद; अकोलाच्या डावखुरा मध्यमगती गोलंदाज रवी ठाकूरची कामगीरी.

Ravi's best bowling in the match against Rajasthan | राजस्थान विरुद्धच्या सामन्यात रवीची उत्तम गोलंदाजी

राजस्थान विरुद्धच्या सामन्यात रवीची उत्तम गोलंदाजी

अकोला: अकोला क्रिकेट क्लबचा डावखुरा मध्यमगती गोलंदाज रवी ठाकूर बीसीसीआय अंतर्गत मध्य विभागामध्ये खेळण्यात येत असलेल्या एक दिवसीय विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व करीत असून, राजस्थान विरुद्धच्या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करीत ७ षटकात राजस्थानचे ३ खेळाडू बाद केले. रवीच्या कामगिरीमुळे विदर्भ संघाला राजस्थान विरुद्धचा आजचा ( ७ नोव्हेंबर रोजीचा) सामना जिंकता आला. नागपूर येथील जामठा स्टेडिअमवर हा सामना खेळला गेला.
७ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत जामठा (व्हीसीए) येथे राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, भारतीय रेल्वे व विदर्भ संघात एक दिवसीय सामने खेळण्यात येत आहे. यामध्ये अकोल्याचा रवी विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. रवी हा अकोला पोलिस विभागात कार्यरत असून, सीजन-२0१२ पासून चार दिवसीय रणजी व एक दिवसीय रणजी ट्रॉफीकरिता तो विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. विदर्भ संघाकडून खेळताना त्याने उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले. रवीच्या कामगिरीबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रशेखर मीणा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, गृह अधीक्षक जाधव, राखीव पोलिस निरीक्षक विनोद ठाकरे, क्रीडा विभागप्रमुख राजू शर्मा यांनी कौतुक केले.

Web Title: Ravi's best bowling in the match against Rajasthan