शिधापत्रिका धारकांना मिळणार दोन महिन्यांचे धान्य मोफत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:19 IST2021-05-07T04:19:46+5:302021-05-07T04:19:46+5:30

कोरोना प्रादुर्भावामुळे आलेल्या आर्थिक व्यत्ययामुळे गरिबांना सामोरे जावे लागत असलेल्या कठीण प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत ...

Ration card holders will get two months free grain | शिधापत्रिका धारकांना मिळणार दोन महिन्यांचे धान्य मोफत

शिधापत्रिका धारकांना मिळणार दोन महिन्यांचे धान्य मोफत

कोरोना प्रादुर्भावामुळे आलेल्या आर्थिक व्यत्ययामुळे गरिबांना सामोरे जावे लागत असलेल्या कठीण प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत लक्ष निर्धारित राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी माहे मे व जून २०२१ करिता दरमहा मासिक राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्रती सदस्य पाच किलो अन्नधान्य मोफत वितरित करण्यात येत आहे. संपूर्ण तालुक्यामध्ये धान्याचा पुरवठा तत्काळ पात्र लाभार्थ्यापर्यंत करण्याचा तहसीलदार प्रदीप पवार यांचा मानस असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पुरवठा विभाग काम करीत आहे. या योजनेचा लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार प्रदीप पवार यांनी केले आहे.

असे मिळणार धान्य

प्राधान्य गटातील लाभार्थीसाठी गहू तीन किलो प्रती व्यक्ती, तांदूळ दोन किलो प्रती व्यक्ती, अंत्योदय गटातील लाभार्थीसाठी गहू १५ किलो प्रती कार्ड, अंत्योदय गटातील लाभार्थीसाठी तांदूळ २० किलो प्रती कार्ड धारकांना मोफत मिळणार आहे. अंत्योदय गटातील लाभार्थीसाठी गहू तीन किलो व तांदूळ दोन किलो प्रती व्यक्ती मोफत मिळेल.

Web Title: Ration card holders will get two months free grain