राठोड आणि हुसेन यांची आज पेशी
By Admin | Updated: December 11, 2014 01:01 IST2014-12-11T01:01:30+5:302014-12-11T01:01:30+5:30
महिला अधिका-याचा छळ करणे भोवले.
_ns.jpg)
राठोड आणि हुसेन यांची आज पेशी
अकोला : हिवताप विभागाचे सहाय्यक संचालक डॉ.एम.एम. राठोड आणि एकाच ठिकाणी ३0 वर्षांपासून कार्यरत असलेला कर्मचारी नासीर हुसेन यांची गुरुवारी विशाखा समितीसमोर पेशी असून, त्यांची सहा सदस्यीय समितीकडून चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सहाय्यक संचालक हिवताप विभागात गत ३0 वर्षांपासून कार्यरत असलेला नासीर हुसेन नामक कर्मचारी आणि सहाय्यक संचालक डॉ.एम. एम. राठोड यांनी लोकसेवा आयोगामार्फत लागलेल्या एका महिला अधिकार्याचा छळ सुरू केला होता. या महिला अधिकार्यांशी असभ्य भाषेत बोलणे, त्यांना साहेबांची मर्जी राखण्यास प्रेरित करण्यासाठी दबाव आणण्याचा पुरेपूर प्रयत्न नासीर हुसेन या कर्मचार्याने सुरू केला होता. मात्र, या प्रकरणी या महिला अधिकार्यांनी आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आणि हा प्रकार ह्यलोकमतह्णने उजेडात आणताच या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
डॉ. अविनाश लव्हाळे यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, गुरुवारी विशाखा समितीसमोर डॉ. एम. एम. राठोड व नासीर हुसेन यांची चौकशी होणार आहे. मानवी हक्क आयोगाच्या महिला अधिकारी, आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे, आरोग्य उपसंचालक कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी करुणा सुरवाडे व आणखी एक महिला अधिकारी, वैद्यकीय विभागाचे सहाय्यक संचालक डॉ.पी.एल. माने यांच्याकडून ही चौकशी करण्यात येणार आहे. नासीर हुसेन या कर्मचार्याने या आधी वृंदन राठोड असतांनाही महिला अधिकारी व कर्मचार्यांचा छळ सुरू केला होता. त्यामुळे हैरान झालेल्या महिला कर्मचार्यांनी या प्रकरणाची तक्रारही केली, मात्र त्यावेळी गंभीर दखल घेण्यात आली नाही. आता सदर प्रकरण ह्यलोकमतह्णने उजेडात आणताच आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे यांनी गंभीर दखल घेत या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.