मागणी घटल्याने घसरले सरकीचे भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 19:42 IST2017-11-11T19:41:18+5:302017-11-11T19:42:31+5:30
अकोला : मागील वर्षीचा सरकीचा साठा मुबलक असल्याने यावर्षी सरकीची मागणी घटली आहे. परिणामी, सरकीच्या दरात प्रचंड घट झाली असून, मागील वर्षी दोन पाचशे रुपये प्रतिक्ंिवटल असलेली सरकी यावर्षी एक हजार सहाशे ते सतराशे रुपये दराने खरेदी केली जात आहे.

मागणी घटल्याने घसरले सरकीचे भाव
- राजरत्न शिरसाट
अकोला : मागील वर्षीचा सरकीचा साठा मुबलक असल्याने यावर्षी सरकीची मागणी घटली आहे. परिणामी, सरकीच्या दरात प्रचंड घट झाली असून, मागील वर्षी दोन पाचशे रुपये प्रतिक्ंिवटल असलेली सरकी यावर्षी एक हजार सहाशे ते सतराशे रुपये दराने खरेदी केली जात आहे. त्याचा परिणाम कापूस दरावरही झाला आहे.
सरकीचा तुटवडा जाणवेल, या भीतीपोटी शेतकºयांनी मागील वर्षी सरकीची मोठ्या प्रमाणात खरेदी करू न साठा केला. त्यामुळे सरकीचे दरही दोन हजार पाचशे रुपये प्रतिक्ंिवटलपर्यंत पोहोचले होते.परिणामी, कापसाच्या दरातच वृद्धी झाली होती. मागील वर्षी पश्चिम विदर्भात कापसाचे प्रतिक्ंिवटल दर हे सहा हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. यावर्षी कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असून, व्यापाºयांकडे मागच्या वर्षीचा सरकीचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे यावर्षी सरकीची मागणी घटली असून, त्याचे परिणाम कापूस दरावरही झाले आहेत.
कापसामध्ये ६५ टक्के सरकीचे प्रमाण असते. यापासून तेल तर काढले जातेच, शिवाय ढेपही तयार केली जाते; पण यापर्षी ढेपचे दरही प्रतिक्ंिवटल सहाशे रुपयांनी घटले आहेत. शनिवारी सरकीच्या दरात ५० रुपये वाढ झाली होती; पण हे दर पुढे वाढणे अशक्य असल्याचे मत व्यापाºयांचे आहे.
सरकीचा साठा उपलब्ध असून, मागणी घटल्याने यावर्षी सरकीचे दर प्रतिक्ंिवटल ७०० ते ८०० रुपयांनी घटले आहेत. यावर्षी तर कापसाची आवक जास्त असल्याने सरकीची मागणी कमी होण्याची शक्यता आहे.
- वसंत बाछुका,
तेल, कापूस उद्योजक,
अकोला.